Saving Bank Account : गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात रोकड म्हणजे कॅशने व्यवहार करण्याऐवजी बँकिंग व्यवहार करण्यावर अधिक भर दिला जात आहे. अगदी तळागाळात वसलेल्या खेड्यापाड्यातील लोकांचे देखील बँक खाते ओपन झाले आहे.
या कामी केंद्र शासनाच्या जनधन योजनेचा देखील मोठा हातभार आहे. आता विद्यार्थ्यांपासून उद्योजकांपर्यंत आणि कष्टकरी कामगारांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचेच बँक खाते आहेत आणि बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे. अनेक लोकांचे तर एकापेक्षा अधिक बँक खाते आहेत.
खरं पाहता बँकेच्या माध्यमातून लवकरात लवकर आर्थिक व्यवहार होत असल्याने आणि बँकेत लोकांचे पैसे अधिक सुरक्षित असल्याने बँकिंग व्यवहाराला प्राधान्य मिळत आहे. मात्र या अशा परिस्थितीत एका व्यक्तीचे किती बँक खाते असू शकतात? एका पेक्षा अधिक बँक खाते असतील तर काय होतं यांसारखे प्रश्न देखील सामान्य जनतेला पडले आहेत. दरम्यान आज आपण या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- मुली वडिलांच्या मालमत्तेवर केव्हा दावा करू शकतात? कायदा सांगतो की….
आपल्या देशातील बहुतेक लोकांचे बँकेत तीन ते चार बचत खाती आहेत. काही लोकांचे तर यापेक्षाही अधिक खाती आहेत. वास्तविक आपल्या देशात एका व्यक्तीचे किती बँक अकाउंट असू शकतात या संदर्भात कोणताच सरकारी नियम आरबीआय ने तयार केलेला नाही. यामुळे अनेक लोकांचे एकापेक्षा अधिक बँक खाती आहेत.
विशेष म्हणजे अधिक बँक खाते असली आणि या खात्यांमध्ये कायदेशीर व्यवहार सुरू असला तर कोणतच नुकसान होत नाही. मात्र जर तुम्ही एखादे बँक खाते अधिक काळ वापरात ठेवले नाही म्हणजेच त्यामध्ये व्यवहार केले नाहीत तर असे बँक खाते बंद होऊ शकते. म्हणून तुमचे जेवढे बँक अकाउंट असतील त्यामध्ये व्यवहार सुरू ठेवणे आवश्यक आहे.
तसेच तुमचे जेवढे बँक अकाउंट असतील त्यामध्ये मिनिमम अकाउंट बैलेंस ठेवणे गरजेचे आहे. सॅलरी अकाउंट मध्ये मात्र मिनिमम अकाउंट बॅलन्सची गरज नसते. परंतु सेविंग अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. जर एखाद्या व्यक्तीने मिनिमम अकाऊंट बॅलन्स मेंटेन केले नाही तर त्यांना पेनल्टी म्हणजेच दंड भरावा लागतो.
विशेष म्हणजे दंड भरल्यानंतरही जर मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नाही तर अकाउंट मायनस मध्ये जाते म्हणजे असे बँक खाते निगेटिव्ह होते. याचा परिणाम सिबिल स्कोर वर होतो. यामुळे सिबिल स्कोर देखील कमी होतो. म्हणून तुमची जेवढी बँक खाते असतील त्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणे अनिवार्य आहे.
याशिवाय बँकेकडून एसएमएस पाठवण्यासाठी दर महिन्याला काही ठराविक चार्जेस कापले जातात. यामुळे जर तुमचे एकापेक्षा अधिक बँक खाते असतील तर प्रत्येक बँक अकाउंट मधून दरमहा ठराविक रक्कम कट केली जाणार आहे. अर्थातच एकापेक्षा अधिक बँक खाते सांभाळण्यासाठी तुम्हाला अधिक खर्च करावा लागणार आहे.
याशिवाय बँकेने जे डेबिट कार्ड म्हणजे ATM card दिलेले असते त्यासाठी देखील वार्षिक आधारावर ठराविक रक्कम बँक आकारात असते. यामुळे तुम्हाला जेवढे आवश्यक आहेत तेवढेच बँक अकाउंट ओपन करणे तुमच्या फायद्याचे आहे. नाहीतर तुम्हाला विनाकारण बँकाचे चार्जेस द्यावे लागणार आहेत.
हे पण वाचा :- यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकातून विक्रमी उत्पादन मिळवायचे ना ! मग पेरणीपूर्वी ‘हे’ महत्वाचं काम कराच, वाचा….