SBI Home Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून अलीकडेचं या बँकेने आपल्या गृह कर्जाच्या व्याजदरात बदल केलेला आहे. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एसबीआयने देखील आपले होम लोनचे व्याजदर कमी केले आहेत. यामुळे एसबीआय कडून होम लोन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसबीआयचे होम लोन व्याजदर
स्टेट बँक ऑफ इंडिया बाबत बोलायचं झालं तर सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना किमान 7.50% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. मात्र हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर आहे. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशा ग्राहकांना स्टेट बँक ऑफ इंडिया कडून किमान 7.50% इंटरेस्ट रेट वर होम लोन मंजूर होऊ शकते. मात्र होम लोन मंजूर करताना बँकेकडून विविध बाबींची पडताळणी केली जाते. कर्ज परतफेड करण्याची क्षमता, उत्पन्न, सिबिल स्कोर अशा वेगवेगळ्या बाबींची पडताळणी करून बँकेकडून कर्जाची रक्कम मंजूर होते.

10 वर्षांसाठी 50 लाखांचे कर्ज घेतल्यास कितीचा EMI
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून जर दहा वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले तर किती रुपयांचा मासिक हफ्ता भरावा लागणार? एसबीआयच्या होम लोन कॅल्क्युलेटर नुसार एसबीआय कडून जर किमान 7.50% व्याजदरात एखाद्या ग्राहकाला दहा वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे गृह कर्ज मंजूर झाले तर त्या व्यक्तीला 59 हजार 351 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
50 लाखासाठी किती व्याज?
दहा वर्षांसाठी 50 लाखांचे गृह कर्ज मंजूर झाले तर 59,351 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे म्हणजेच दहा वर्षांच्या काळात सदर ग्राहकाला 71 लाख 22 हजार 106 रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये व्याज आणि मुद्दल यांचा समावेश आहे. अर्थातच सदर ग्राहकाला फक्त व्याज म्हणून 21 लाख 22 हजार 106 रुपये बँकेला द्यावे लागतील. पण जर एसबीआय कडून व्याजदरात बदल झाला तर कॅल्क्युलेशन देखील पूर्णपणे बदलणार आहे. तसेच या रकमेत प्रोसेसिंग फी व इतर चार्जेसचा सुद्धा समावेश नाहीये. यामुळे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे किंवा बँकेत भेट देऊन तुम्ही याबाबतची तपशीलवार माहिती जाणून घेऊ शकता.