SBI Mutual Fund SIP : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड चा सुद्धा पर्याय गुंतवणूकदारांपुढे आहे. पूर्वी भारतात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवले जात होते. अनेक जण पोस्ट ऑफिस आणि बँकेच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवत होते.
काहीजण तर फक्त सोन्यातच पैसे गुंतवत होते. पण आता लोकांचा माईंडसेट बदलला आहे आणि तरुण वर्ग शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीम पूर्ण ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवताना दिसत आहेत.
![SBI Mutual Fund SIP](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/SBI-Mutual-Fund-SIP.jpeg)
विशेष बाब अशी की शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांनी यातून करोडो रुपयांची कमाई सुद्धा केली आहे. दरम्यान आज आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत.
आज आपण आजच्या या बातमीपत्रामधून एसबीआयच्या एका अशा म्युच्युअल फंडची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने दरमहा तीन हजार रुपयांची एसआयपीवर तब्बल 1.14 कोटी रुपयांचा परतावा मिळवून दिलाय.
कोणता आहे तो Mutual Fund?
आम्ही ज्या म्युच्युअल फंड बाबत बोलत आहोत तो आहे एसबीआयचा SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड. या योजनेची सुरुवात खरंतर पाच जुलै 1999 ला झाली. या कालावधीत एकरकमी गुंतवणुकीवर या योजनेने गुंतवणूकदारांना वार्षिक 15.81% या दराने परतावा देण्याची किमया साधली आहे.
तसेच यात एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना लॉन्च झाल्यापासून आत्तापर्यंत वार्षिक 16.97% दराने परतावा मिळाला आहे. दरम्यान आता आपण हा फंड लॉन्च झाल्यापासून जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा 3 हजार रुपयांची एसआयपी केली असेल तर आतापर्यंत त्या गुंतवणूकदाराला किती रिटर्न मिळाले असतील ? याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
3 हजाराच्या एसआयपीने बनवले करोडपती
एसबीआयच्या या म्युच्युअल फंड मध्ये जर 1999 पासून एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा 3 हजार रुपये गुंतवले असतील म्हणजेच तीन हजार रुपयांची एसआयपी केली असेल तर वार्षिक 16.97% दराने 25 वर्षांनी एक कोटी चौदा लाख पाच हजार 801 रुपये रिटर्न मिळाले असतील.
यामध्ये सदर गुंतवणूकदाराची गुंतवणूक ही नऊ लाख रुपये असेल आणि उर्वरित रक्कम म्हणजेच एक कोटी पाच लाख 5 हजार 801 रुपये हे त्या गुंतवणूकदाराला मिळालेले व्याज स्वरूपातील रिटर्न राहणार आहे.