Shani Gochar:- नऊ ग्रह आणि बारा राशी यांचा एकमेकांशी खूप घनिष्ठ संबंध असून ग्रहांच्या प्रत्येक स्थितीचा चांगला किंवा वाईट परिणाम हा प्रत्येक राशीवर होत असतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्योतिषशास्त्रानुसार कळत असतात.
जर आपण ग्रहांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये शनी ग्रहाला खूप महत्त्व असून शनि हा न्याय देवता आणि कर्मानुसार फळ देणारी देवता म्हणून ओळखली जाते.

सध्या जर आपण ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर शनी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून 15 नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे व येणाऱ्या 28 मार्च 2025 पर्यंत कुंभ राशी मध्येच स्थित असणार आहे.
त्यानंतर मात्र शनी गोचर करणार असून कुंभ राशीतून मीनराशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे हा या दरम्यानचा जो 173 दिवसांचा काळ आहे हा प्रामुख्याने तीन राशींसाठी खूप फलदायी असा असून ज्योतिष शास्त्रानुसार या तीन राशींवर शनीची विशेष कृपा असणार आहे.
या तीन राशींवर 173 दिवस राहील शनीची विशेष कृपा,मिळेल पैसा आणि मानसन्मान
1- सिंह राशी– सध्या शनी कुंभ राशीमध्ये असल्याने सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शनीची ही स्थिती खूप फायद्याची सिद्ध होणार आहे. या काळात तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळणार असून आर्थिक समृद्धी देखील मिळणार आहे.
173 दिवसांच्या या कालावधीत सिंह राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विशेष सुख समृद्धीत वाढ होणार असून या कालावधीत गुंतवणूक केली तर खूप फायदा मिळणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे कर्ज फेडण्यास देखील मदत होईल व नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील. वरिष्ठांची मदत मिळेल तसेच विद्यार्थी वर्गासाठी हा कालावधी खूप उत्तम व फलदायी आहे.
तसेच करिअरमध्ये देखील यश मिळणार असून नोकरीत प्रमोशन मिळणार आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील त्यांना देखील यश मिळणार असून विद्यार्थी वर्गासाठी हा उत्तम कालावधी आहे.
2- तुळ राशी– शनीची कुंभ राशीतील स्थिती तूळ राशींच्या व्यक्तींसाठी देखील फलदायी आहे. 173 दिवसांचा हा कालावधी तूळ राशीसाठी अनुकूल असून पैशांची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.
फक्त या कालावधीत थोडेफार आरोग्याच्या समस्या उद्भवतील त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग सापडतील व कुटुंबासोबत त्याचे संबंध देखील घट्ट होतील.
जे व्यक्ती नोकरी करतात त्यांच्या कामामध्ये चांगला बदल दिसून येईल. या काळात साहस निर्माण होईल व कामाच्या ठिकाणी देखील खूप कौतुक होईल. तसेच समाजात मान सन्मान वाढीस लागेल व कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जायचा देखील योग आहे.
3- मेष राशी– शनीची ही स्थिती मेष राशीच्या व्यक्तींसाठी पुढच्या 173 दिवसासाठी खूप शुभदायी आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास येतील तसेच मानसन्मान वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. वैवाहिक जीवन देखील सुखकारक असणार आहे.
जे व्यक्ती अविवाहित असतील त्यांचे लग्न ठरेल. या कालावधीत मित्रांसोबत पिकनिकच्या प्लान देखील बनवू शकतात. कुटुंबात देखील आनंदी आनंदाचे वातावरण राहील व आर्थिक अडचण दूर होतील.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या कालावधीत उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या कामांमध्ये चांगले बदल दिसून येतील व कुटुंबासोबतचे संबंध दृढ होतील.