Share Market: शेअर बाजारात गुंतवणूक करून तुम्हाला देखील चांगला पैसा मिळवायचा आहे का? ‘या’ शेअर्समधील गुंतवणूक देईल चांगला परतावा

Ajay Patil
Published:
share market

Share Market:- साधारणपणे शेअर बाजारातील चढ उतार ही देशांमधील अनेक प्रकारच्या घडामोडींवर आधारित असते व तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा देखील बाजारावर खूप मोठा प्रमाणावर प्रभाव पडत असतो व यामुळे बाजारात कायम चढउतार आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या चढउताराच्या परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते

व अशा शेअरची निवड तुमच्या विश्वासात असलेल्या गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्यानेच करणे फायद्याचे ठरते. तसेच यामध्ये आपला देखील स्वतःचा बाजाराचा अभ्यास महत्त्वाचा असतो.

सध्या जर आपण शेअर्स बाजाराची परिस्थिती पाहिली तर यामध्ये काही कंपन्यांचे शेअर्स हे तुम्हाला कमीत कमी कालावधीत चांगला परतावा द्यायला सक्षम आहेत व यामध्ये विशिष्ट घडामोडींचा आधार घेऊन गुंतवणूक तज्ञांनी काही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला आहे. या शेअरची यादी आपण बघू.

 या शेअर्समधील गुंतवणुकील अल्पावधीत चांगला परतावा

1- टेक महिंद्रा शेअर बाजारतज्ञ प्रितेश मेहता यांनी टेक महिंद्रा या कंपनीचा शेअरची खरेदी करण्याचा सल्ला दिला असून त्यांनी प्रति शेअर 1560 रुपयाचे टार्गेट दिले आहे तर 1390 रुपयांचा स्टॉप लॉस दिला आहे. सध्या हा शेअर्स बाजारामध्ये 1429 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे.

2- ग्रॅन्युअल इंडिया बाजार तज्ञ प्रितेश  मेहता यांनी ग्रॅन्युअल्स इंडिया या शेअरची खरेदी करण्याचा सल्ला दिला असून त्यासाठी 530 चे प्रति शेअर टार्गेट दिले आहेत तर 485 रुपयांचा स्टॉपलॉस दिला आहे. सध्या हा शेअर 493 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे.

3- इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड शेअर बाजाराची तज्ञ कुणाल बोथरा यांनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचा शेअर खरेदी करण्याचा मोलाचा सल्ला दिला असून यासाठी प्रति शेअर पाचशे वीस रुपयाचे टार्गेट दिले असून 470 चा स्टॉपलॉस दिला आहे. सध्या हा शेअर्स 504 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे.

4- कोटक महिंद्रा बँक शेअर बाजारतज्ञ कुणाल बोथरा यांनी कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला असून यासाठी प्रति शेयर्स 1950 रुपयांचे टार्गेट दिले असून 1800 रुपयांचा स्टॉपलॉस दिला आहे. सध्या हा शेअर्स 1803 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे.

5- मन्नापुरम फायनान्स बाजारतज्ञ कुणाल बोथरा यांनी मन्नापुरम फायनान्स शेअर्स खरेदी करण्याचा मोलाचा सल्ला दिला असून यासाठी प्रति शेअर 230 रुपयांचे टार्गेट दिले असून दोनशे रुपयांचा स्टॉप लॉस दिला आहे. सध्या हा शेअर तुमच्या 208 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe