गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! ‘हा’ 5 रुपयाचा स्टॉक पोहचला 590 रुपयावर, 78 हजाराचे बनलेत 1 कोटी; पहा डिटेल्स

Ajay Patil
Published:
Share Market Multibagger Stock

Share Market Multibagger Stock : शेअर मार्केट हे एक असं मार्केट आहे जिथे अनिश्चितता भरपूर आहे. पण जर योग्य कंपनीचा स्टॉक निवडला, योग्य वेळी निवडला आणि योग्य स्टॉक मध्ये केलेली गुंतवणूक बऱ्याच काळ होल्ड करून ठेवली तर शेअर मार्केट बंपर परतावा देण्यासाठी देखील ओळखले जाते.

खरं पाहता शॉर्ट टर्ममध्ये शेअर मार्केट मधून फारसा परतावा मिळत नाही. हा, निश्चितच एखादा स्टॉक कमी काळात देखील आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतो. पण अधिकतर असे पाहिले गेले आहे की, लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये शेअर मार्केट मधून चांगला परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे.

आज आपण अशाच एका स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत ज्याने लॉन्ग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना करोडो रुपयाचा परतावा काही हजाराच्या इन्वेस्टमेंट मध्ये दिला आहे.

शेअर मार्केट मधील एका 5 रुपयाच्या स्टॉकने लॉंग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांचे 78 हजाराचे एक कोटी रुपये बनवून दिले आहेत. आता तुम्हाला निश्चितच या स्टॉक संदर्भात जाणून घ्यायचं असेल चला तर मग जाणून घेऊया याविषयी.

हे पण वाचा :- याला म्हणतात मल्टिबॅगर स्टॉक ! 12 रुपयाचा ‘हा’ स्टॉक पोहोचला 106 रुपयांवर, गुंतवणूकदार झालेत मालामाल; स्टॉकची ए टू झेड माहिती वाचा

कोणता आहे तो स्टॉक?

हा स्टॉक आहे कंट्रोल प्रिंटचा. ही एक प्रिंटर तयार करणारी कंपनी आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या कंपनीचा हा स्टॉक 2001 मध्ये मात्र चार रुपये आणि 57 पैशांवर ट्रेड करत होता. परंतु आता 2023 मध्ये हा स्टॉक 580 रुपयावर ट्रेड करत आहे. विशेष म्हणजे या शुक्रवारी या स्टॉकने 597 रुपयाचा विक्रमी टप्पा गाठला आहे.म्हणजेच या स्टॉकने 2001 पासून आत्तापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 12860% चा रिटर्न दिला आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉक मध्ये 22 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 मध्ये 78000 रुपयाची गुंतवणूक केली असेल आणि ही गुंतवणूक आत्तापर्यंत होल्ड करून ठेवली असेल तर अशा गुंतवणूकदाराला तब्बल एक कोटी रुपयांचा परतावा या स्टॉक मधून मिळाला असेल. खरं पाहता शेअर मार्केटमध्ये चढ-उतार सुरूच असतो.

हे पण वाचा :- अहमदनगर, नासिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह ‘या’ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; भारतीय हवामान विभागाचा अलर्ट

हेच कारण आहे की, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा स्टॉक 376 रुपयांपर्यंत खाली आला होता. त्यावेळी हा स्टॉक आठवड्यातील निचांकी पातळीवर ट्रेड करत होता. दरम्यान तेव्हापासून पुढील पाच महिन्यात म्हणजे आत्तापर्यंत या स्टॉकने 59% उसळी देखील घेतली आहे.

शिवाय काही ब्रोकरेज फर्मने या स्टॉक मध्ये आणखी सुधारणा होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये आणखी 17% सुधारणा होऊ शकते असं मत काही ब्रोकरेज फर्म्सने व्यक्त केले आहे. एकंदरीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा दिला आहे.

मित्रांनो, येथे दिलेली माहिती ही केवळ आणि केवळ स्टॉकच्या परफॉर्मन्स संदर्भात आहे. या माहितीच्या आधारावर गुंतवणूक करू नये. म्हणजे गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे जरुरीचे आहे. 

हे पण वाचा :- पंजाब डख यांचा तातडीचा मेसेज; आज आणि उद्या ‘या’ जिल्ह्यात गारपीट होणार, पहा संपूर्ण हवामान अंदाज

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe