Share Market News : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बोनस शेअर्स आणि डिव्हिडंट देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करू इच्छिणाऱ्यांसाठी ही बातमी खास ठरणार आहे. खरेतर, देशातील प्रमुख आरोग्य सेवा देणाऱ्या डॉ. लाल पॅथलॅब्स लिमिटेडने बोनस शेअर जारी करण्याची घोषणा केली आहे.
या कंपनीने शुक्रवारी बाजार बंद होतानाच बोनस शेअर्ससह लाभांश जाहीर केला. डॉ. लाल पॅथलॅब्सने विक्रमी लाभांश जाहीर केला असल्याने या कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. आज सोमवारी सुद्धा हे स्टॉक फोकस मध्ये राहिलेत.

डॉक्टर लाल पॅथलॅब्सने प्रत्येक 1 शेअरसाठी 1 मोफत शेअर देण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी एक्सचेंजला दिलेल्या निवेदनात, लाल पॅथलॅब्सने सांगितले की ते 10 रुपयांच्या दर्शनी मूल्यासह प्रति शेअर 1 बोनस शेअर दिला जाणार आहे.
पण कंपनीने अद्याप या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. प्रत्येक शेअरवर लाभांश देखील दिला जाईल. डॉ. लाल पॅथलॅब्स लिमिटेडने एक्सचेंजला कळवले आहे की 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या शेअरवर 70% लाभांश दिला जाईल.
याचा अर्थ पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 7 रुपये लाभांश मिळणार आहे. डॉ. लाल पॅथलॅब्सने 7 नोव्हेंबर ही लाभांशाची रेकॉर्ड डेट म्हणून घोषित केली आहे. या आर्थिक वर्षात कंपनीचा हा दुसरा अंतरिम लाभांश राहणार आहे.
ज्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि डिव्हिडंट देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्टमेंट करायची आहे त्यांच्यासाठी नक्कीच ही एक मोठी संधी राहणार आहे. खरंतर अनेक जण बोनस शेअर्स आणि लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छितात.
नक्कीच अशा लोकांसाठी ही संधी मोठी फायद्याची ठरणार आहे. दरम्यान, कंपनीच्या या घोषणेनंतर शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. शुक्रवारी बाजार बंद होताना, कंपनीचे शेअर्स बीएसई वर 1.52 टक्क्यांनी वाढले होते.
कंपनीचे शेअर्स 3136.10 वर व्यवहार करत होते. गेल्या सहा महिन्यांत डॉ. लाल पथ लॅब्स लिमिटेडचे शेअर्स 13.36 टक्क्यांनी वाढले आहेत. पण, गेल्या वर्षभरात या शेअरने फक्त 0.80 टक्के परतावा दिला आहे.













