गुंतवणूकदारांची झाली चांदी ! ‘या’ शेअरने मात्र 3 वर्षात दिलेत 491% रिटर्न्स, पहा….

Ajay Patil
Published:

Share Market Tips : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. जर आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर एक गोष्ट आपणास माहिती असेल ती म्हणजे शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म मध्ये इन्वेस्ट केल्यास अधिक परतावा मिळत असतो.

शेअर बाजारातील अनेक तज्ञ देखील लॉंग टर्म गुंतवणूक करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना देत असतात. मात्र असेही काही शेअर्स असतात जे अल्पावधीतच आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची किमया असतात.

आज आपण अशाच एका शेअरची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 491% रिटर्न्स दिले आहेत. आता तुम्हालाही या शेअर्स बाबत जाणून घ्यायचं असेलच ना! चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

हे पण वाचा :- चिंताजनक ! हवामानात झाला मोठा बदल; बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाची शक्यता, ‘या’ तारखेला जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

कोणता आहे हा स्टॉक

हा स्टॉक आहे एचएफसीएल लिमिटेडचा. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या तीन वर्षात 491 टक्क्याहून अधिक रिटर्न्स देण्याचा भीम पराक्रम करून दाखवला आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की हा शेअर शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर ₹64.76 वर बंद झाला आहे.हाती आलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत शेअरची किंमत 28.15 रुपयावरून 64 रुपये आणि 76 पैशांवर पोहोचली आहे.

म्हणजे गेल्या पाच वर्षात या शेअरने 142.55% एवढा परतावा आपल्या गुंतवणूकदारांना दिला असून गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. तसेच गेल्या तीन वर्षांचा विचार केला असता या शेअरची किंमत ₹10.84 वरून सध्याच्या किंमतीपर्यंत पोहोचली आहे.

हे पण वाचा :- आठवी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! भारतीय पोस्टात निघाली विविध पदासाठी भरती, मुंबईत असणार नोकरीची संधी, आजच करा अर्ज

म्हणजे या कालावधीत या शेअरने 491.42% एवढा मल्टीबॅगर परतावा आपल्या गुंतवणूकदारांना दिला आहे. परंतु गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये 4.34% ची घसरण दिसून आली आहे.

तसेच हा शेअर 2023 मध्ये आतापर्यंत 14.34% ने घसरला आहे. अर्थातच या शेअरमध्ये चढ उतार पाहायला मिळाली आहे.मित्रांनो येथे दिलेली माहिती ही फक्त स्टॉकच्या परफॉर्मन्सविषयी देण्यात आली आहे.

ही माहिती कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदाराने आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे जरुरीचे आहे.

हे पण वाचा :- मुंबईमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! MMRDA मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, वाचा याविषयी सविस्तर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe