Share Market Tips : शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे पूर्णपणे जोखीमीने परिपूर्ण आहे. पण यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या खूप अधिक आहे. शेअर बाजारात असे काही स्टॉक किंवा शेअर्स आहेत जे अल्पावधीतच गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. मात्र काही शेअर्सला ग्रो करायला खूपच उशीर होत आहे. गुंतवणूकदारांना काही शेअर्समधून चांगला रिटर्न मिळवण्यासाठी अनेक वर्ष वाट पहावी लागत आहे.
काही शेअर्स मात्र काही महिन्यांच्या कालावधीमध्येच गुंतवणूकदारांना चांगला जोरदार परतावा देत आहेत. दरम्यान आज आपण अशा एका शेअर्सची माहिती जाणून घेणार आहोत ज्या शेअर्सने मात्र नऊ महिन्यांच्या काळामध्ये 550% रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिले आहेत. स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट या कंपनीच्या स्टॉकने हा जोमदार परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.
हे पण वाचा :- मुंबई ते नागपूरचा प्रवास होणार आणखी जलद ! सुरु होणार नवीन सुपरफास्ट ट्रेन; केव्हा सुरु होणार, ट्रेनला कुठ राहतील थांबे, पहा……
या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने असा काही बंपर परतावा दिला आहे की, काही महिन्यातच या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी या ठिकाणी झाली आहे. 11 जानेवारी 2023 रोजी हा शेअर मात्र 41 रुपये 80 पैशावर ट्रेड करत होता. मात्र आता काल म्हणजेच गुरुवारी हा शेअर 131 रुपये 95 पैशावर ट्रेड करायला लागला आहे. म्हणजेच अवघ्या चार महिन्याच्या काळातच या स्टॉकने मोठी प्रगती केली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की 27 मार्च 2020 मध्ये हा शेअर मात्र 13 रुपये आणि 25 पैशांवर ट्रेड करत होता. मात्र आता 131.95 रुपयांवर हा शेअर ट्रेड करत आहे. म्हणजे गत 3 वर्षाचा विचार केला असता या शेअर्सने एकूण 896% परतावा दिला आहे. निश्चितच या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक कुबेरचा खजाना सिद्ध झाला आहे. दरम्यान आता स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट कंपनीने गुंतवणूकदारांना खुश करण्यासाठी बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनी 2:3 या प्रमाणात बोनस शेअर देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यासाठी मात्र 25 एप्रिल पर्यंत ची मुदत राहणार आहे. 25 एप्रिल पर्यंत जे गुंतवणूकदार या कंपनीचे शेअर घेतील त्यांना बोनस शेअर्स मिळणार आहेत. एकंदरीत या शेअर्सने अल्पावधीतच गुंतवणूकदारांना मालामाल करून सोडले आहे. आता कंपनीने बोनस शेअर्सची घोषणा केली असल्याने या कंपनीत गुंतवणूकदारांची संख्या वाढणार यात शंकाच नाही.
मात्र कोणत्याही स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा कोणतेही शेअर्स घेण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराशी एकदा चर्चा करणे आवश्यक आहे. आम्ही आपणांस कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी सल्ला देत नाहीत. या लेखात दिलेली माहिती ही केवळ आणि केवळ सामान्य माहिती म्हणून देण्यात आली आहे, हा कोणत्याही परिस्थितीत वित्तीय सल्ला वाचकांसाठी राहणार नाही याची नोंद घेणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :- गुंतवणूकदारांसाठी ‘हा’ स्टॉक ठरला कुबेर का खजाना ! फक्त 6 महिन्यात 2 लाखाचे बनवलेत 30 लाख, पहा….