‘या’ उद्योजकाने उभी केली जगातील सर्वात मोठी कार्गो क्षेत्रातील कंपनी; वाचा कसा वाढवला 25 हजारापासून 7000 कोटी पर्यंतचा व्यवसाय?

Ajay Patil
Published:
shashi kiran shetty

आज आपण जे काही यशस्वी लोक बघतो तेव्हा आपल्याला बऱ्याचदा अशा लोकांचा हेवा वाटतो. परंतु आजसर आपण त्यांच्याकडे बघितले तर त्यांची यश आपल्याला भावते. परंतु जर त्यांच्या या यशामागे संपूर्ण काही बघितली तर ती असंख्य काट्याकुट्यांनी भरलेल्या आणि विपरीत परिस्थितीशी दोन हात करत अगदी जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी भरलेले आपल्याला दिसते.

कारण यश माणसाला एका रात्रीत तर कधीच मिळत नाही. व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेव्हा तू झटत असतो तेव्हा त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर काही गोष्टींचा त्याग देखील करावा लागतो व ध्येयाचा पाठलाग करताना कितीही परत परिस्थिती आली तरी दोन हात करत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावे लागते.

अगदी याच पद्धतीने आपण प्रवास पाहिला तर तो प्रसिद्ध उद्योजक शशिकिरण शेट्टी यांचा सांगता येईल. कारण परिस्थितीवर मात करत वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक केली व एका व्यवसायाला सुरुवात केली. तो त्यांचा हा व्यवसाय आज तब्बल 7000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.

 शशी किरण शेट्टी यांची यशोगाथा

शशिकिरण शेट्टी यांचा जन्म 7 जून 1957 रोजी कर्नाटक राज्यामध्ये झाला. पुढे त्यांनी श्री वेंकटरामन स्वामी महाविद्यालयातून कॉमर्स पूर्ण केले व नोकरी मिळावी या उद्देशाने त्यांनी 1978 या वर्षी मुंबई शहरात पाऊल ठेवले.

परंतु नोकरीसाठी मुंबईत आलेल्या शशी किरण यांच्या नशिबात मात्र नियतीने काही वेगळेच लिहून ठेवलेले होते. त्यांनी नोकरी न करता 25 व्या वर्षी व्यवसाय सुरू करायचे ठरवले व याकरिता 25 हजार रुपये गुंतवले व व्यवसायाला सुरुवात केली.

त्यांचा व्यवसाय हा कार्गो क्षेत्रात असून त्यांची कंपनी ऑल कार्गो ग्रुप ही आज जगातील सर्वात मोठी एलसीएल कन्सोली डेटर असून या कंपनीचे सध्या किंमत साधारणपणे 7000 कोटींच्या घरात आहे.

 व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदरची पार्श्वभूमी आणि आता व्यवसायाची स्थिती

शिक्षण पूर्ण करून जेव्हा ते मुंबईमध्ये आले तेव्हा त्यानंतर त्यांनी इंटर मॉडेल ट्रान्सपोर्ट अँड ट्रेडिंग सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी काम करायला सुरुवात केली व त्यानंतर त्यांनी फोर्बस गोकाकमध्ये काम केले. परंतु स्वतःचा व्यवसाय असावा आहे मनात निरंतर सुरू असल्याने त्यांनी कष्टाच्या जोरावर वयाच्या 25 व्या वर्षी ट्रान्स इंडिया फ्रेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाचा व्यवसाय सुरू केला.

त्यानंतर 1994 मध्ये ऑल कार्गो ग्रुप ही कंपनीची सुरुवात केली. आज ही कंपनी यशाच्या शिखरावर असून जगातील तब्बल 180 देशांमध्ये साडेचार हजार पेक्षा अधिक कर्मचारी आणि ऑफिसेस या कंपनीचे आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातील ही सर्वात मोठी कंपनी असून जगातील सर्वात मोठी एलसीएल कन्सोलीडेटर देखील आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe