शिंदे-फडणवीस सरकारच गिफ्ट ! एसटीचा प्रवास होणार आरामदायी ! मिळणार अश्या सुविधा…

Ahmednagarlive24
Published:

Maharashtra ST News :- महाराष्ट्रात अलीकडील काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यासोबतच एसटी महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या एसटीदेखील नवीन रूपात, आरामदायी सोयीसुविधांसह बनवल्या जात असल्याने प्रवाशांना आता आणखी आरामदायी प्रवास एसटीने करणे शक्य होणार आहे.

पुणे विभागाला येत्या काही दिवसांमध्ये ३३० एसटी मिळणार असून, त्यातील काही एसटी बस या मार्चअखेरीस पुणे विभागात दाखल होतील अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी दिली.

हे पण वाचा : ही 10 आहेत महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणे, तुमच्या जोडीदारासोबत एकदातरी नक्की जाऊन या…

पुण्यातील दापोडीस्थित एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत या बस बनवण्याचे काम सुरू असून, दर महिन्याला ६० बस बनवण्याची या कार्यशाळेची क्षमता आहे. यामुळे आता प्रवाशांसाठी नव्या रुपातील आरामदायी एसटी बस उपलब्ध होणार आहेत.

आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदत

  • इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे.
  • प्रतितास ७० किमी या वेगाने त्या धावणार आहेत.
  • या बसला सॅटेलाइट सेंट्रल सहर जोडले जाणार
  • व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टम लावण्यात येणार असल्यामुळे बसच्या लोकेशनची माहितीही प्रवाशांना मिळणार
  • प्रवाशांना आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदत उपलब्ध होऊ शकणार.

हे पण वाचा : Interesting Gk Question : कोणता प्राणी जखमी झाल्यानंतर माणसांप्रमाणे रडतो?

जिल्ह्याला मिळणार ३३० नवीन बस

  •  पुणे जिल्ह्याला नवीन ३३० एसटी बस मिळणार आहेत. यामध्ये १५० इलेक्ट्रिक शिवाई, ८० लालपरी, १०० इलेक्ट्रिक शिवनेरी बसचा समावेश आहे.
  • १५० इलेक्ट्रिक शिवार्डपैकी ७५ ई-बस मार्चअखेरीस पुणे विभागात दाखल होणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
  • संपूर्ण राज्यातील एसटी विभागांमध्ये ५ पेक्षा अधिक बस दाखल होणार असल्याने या बसच्या चार्जिंगसाठी १०१ डेपोंमध्ये १७२ चार्जिंग स्टेशन्स. देखील उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

हे पण वाचा : मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील टोल दरात ‘या’ दिवसापासून होणार मोठी वाढ

आरामदायक आणि आनंदी प्रवास

बसमध्ये विशिष्ट प्रकारच्या स्टीलचा वापर करण्यात आल्याने ही बस लालपरीच्या तुलनेत अधिक वेगळ्या दोन अशा एकूण ४६ सीटची व्यवस्था ४४, तसेच चालक वाहकास मजबूत राहणार आहे.

बसमध्ये असलेल्या सीट मागे-पुढे करता येणार आहे. प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था राहणार आहे. खिडकीची व्यवस्थाही वेगळी करण्यात आली असल्यामुळे प्रवाशांना बाहेरचा निसर्गरम्य नजारा बघत आनंदी अन् आरामदायक प्रवासाची अनुभूती मिळणार आहे.

हे पण वाचा : ग्राहकांसाठी खुशखबर ! सोने, चांदी पुन्हा घसरली; जाणून घ्या आजचे ताजे दर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe