स्वतःचा बिजनेस सुरु करायचाय ? मग दीड लाखाच्या गुंतवणूकीत ‘हा’ बिजनेस सुरु करा, दरमहा मिळणार 60 हजारापर्यंतचा नफा

तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही केळी पासून कागद बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हा बिजनेस सुरू करण्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते. मात्र यासाठी सरकार मदत करते. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत तुम्ही या व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता आणि हा व्यवसाय सहज सुरू करू शकता.

Published on -

Small Business Idea : तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर, अलीकडे भारतात नोकरीऐवजी व्यवसायाला प्राधान्य दाखवले जात आहे. दररोज 9 ते 5 नोकरीं करून तुम्ही ही कंटाळा आला असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन बिजनेस आयडिया घेऊन हजर झालो आहोत.

खरेतर अनेकांना व्यवसाय सुरू करायचा असतो मात्र गुंतवणूकीअभावी व्यवसाय सुरू करता येत नाही. पण आज आपण अशा एक बिझनेस प्लॅन ची माहिती पाहणार आहोत जो की कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो आणि यातून चांगली कमाई देखील होते.

कोणता आहे तो व्यवसाय?

आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो व्यवसाय आहे केळीपासून कागदं बनवण्याचा व्यवसाय. खरेतर, केळीचा कागद हा केळीच्या झाडाच्या सालीच्या तंतूंपासून तयार केलेला कागद असतो.

पारंपारिक कागदाच्या तुलनेत केळीच्या कागदात कमी घनता, डिस्पोजेबिलिटी, नूतनीकरणक्षमता आणि उच्च तन्य शक्ती असते. यामुळे हा कागद पर्यावरण पूरक असतो. हेच कारण आहे की अलीकडे या कागदाची मागणी वाढत चालली आहे. म्हणून या व्यवसायातून चांगली कमाई देखील होण्याची शक्यता असते.

व्यवसायासाठी किती इन्व्हेस्टमेंट करावी लागणार?

खरे तर केळी कागद बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळपास साडेसोळा लाख रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागतो. मात्र या व्यवसायासाठी आवश्यक असणारा पैसा तुम्ही कर्जस्वरूपात उभा करू शकता. तुमच्याकडे जर दीड ते दोन लाख रुपयांची रक्कम असेल तर तुम्ही या व्यवसायासाठी आवश्यक असणारी उर्वरित रक्कम कर्ज स्वरूपात उभी करू शकता.

व्यवसायासाठी कोणत्या परवानग्या घ्याव्या लागतात?

हा बिजनेस सुरू करण्यासाठी काही परवानग्या सुद्धा घ्याव्या लागतात. हा बिजनेस सुरू करण्यासाठी जीएसटी नोंदणी, एमएसएमई उद्योग ऑनलाइन नोंदणी, बीआयएस प्रमाणपत्र, प्रदूषण विभागाकडून एनओसी आवश्यक असते.

किती कमाई होणार ?

हा व्यवसाय सुरू केल्यास तुम्हाला पहिल्याच वर्षी पाच लाखाहून अधिक कमाई होणार आहे. तसेच, या बिजनेसमधून दुसऱ्या वर्षी 6.01 लाख रुपये आणि तिसऱ्या वर्षी 6.86 लाख रुपये नफा होईल.

यानंतर हा नफा झपाट्याने वाढणार असून पाचव्या वर्षी सुमारे 8 लाख 73 हजार रुपयांचा नफा होणार आहे. एकंदरीत तुम्ही केळी पासून कागद बनवण्याचा व्यवसाय सुरू करून दरवर्षी लाखो रुपयांची कमाई करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe