शेतकऱ्यांनो, सर्पदंश झाला तर घाबरू नका, ‘हे’ काम करा; पण सापाने चावा घेतल्यास ‘या’ गोष्टी करणे टाळा, नाहीतर….

Ajay Patil
Published:

Snake Bite Precautions : मान्सून आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येत्या काही तासात दाखल होणार आहे. IMD ने याबाबत माहिती दिली आहे. आयएमडीने सांगितले की, उद्या अर्थातच 12 जूनला गोवा आणि महाराष्ट्रात मान्सून आगमन होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

तसेच गेल्या काही दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस देखील बरसला आहे. या पावसाळ्यात मात्र शेतकऱ्यांना शेती शिवारात कामे करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. खरंतर, पावसाळ्याच्या काळात बिळामधून साप बाहेर येतात. बिळामध्ये पाणी साचत असल्याने साप बाहेर पडतात.

शिवाय या काळात अनेक सापांच्या जातींची प्रजनन होत असते. यामुळे साप बिळाबाहेर पडतात आणि मानवी वस्त्यांकडे येतात. अशा स्थितीत पावसाळा सुरु झाला की, सर्पदंशाच्या घटना अधिक पाहायला मिळतात. ज्या भागात पाऊस अधिक पडतो अशा भागात सर्पदंशाच्या घटना अधिक होतात.

यामुळे साप चावेल या भीतीने साप दिसला की लगेचच सापाला लोक मारतात. मात्र सापाला मारणे हे चुकीचे आहे. साप आपल्या घरात, परिसरात किंवा शेत शिवारात दिसला तर तुम्ही सर्पमित्राला पाचारण करू शकता. तसेच साप चावल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही बरे होऊ शकता.

दरम्यान, आज आपण साप चावल्यास काय करू नये? तसेच सर्पदंश झाल्यास सर्वप्रथम काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात? या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

हे पण वाचा :- तुम्हाला जमिनीचा, जागेचा नकाशा हवा आहे का ? मग ‘या’ पद्धतीने 2 मिनिटात मोबाईलवरच मिळवा ऑनलाईन नकाशा, वाचा संपूर्ण प्रोसेस

सर्पदंश झाल्यास काय करू नये?

अनेकजण सर्पदंश झाला की चुकीच्या पद्धतीचा अवलंब करतात. यामुळे ज्या व्यक्तीला साप चावला आहे ती व्यक्ती अनेक प्रसंगी दगावते. यामुळे सर्पदंश झाल्यानंतर काही चुकीच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

जसे की, साप चावला की चित्रपटात दाखवतात तस सर्पदंश झालेल्या ठिकाणाहून विष तोंडाने ओढून काढू नका.

अनेकजण जिथे सापाने चावा घेतला आहे तिथे चिरा मारतात. लोकांचा असा समाज आहे की चिरा मारल्याने विष तेथून बाहेर निघते, मात्र तसे काही होत नाही. म्हणून सर्पदंशाच्या जागी चिरा मारून घेऊ नका.

सर्पदंश झाला की अनेकजन सापाचे विष शरीरात पसरू नये म्हणून ज्या ठिकाणी सापाने चावा घेतला आहे त्याच्या वरील/खालील बाजू दोरीने किंवा फडक्याने बांधतात. पण असे करू नये.

ग्रामीण भागात सर्पदंश झाला की सर्वप्रथम वैदू, बुवा, बाबा यांच्याकडे साप चावलेल्या व्यक्तीला घेऊन जातात. मग तो बाबा काहीतरी मंत्र म्हणतो आणि सापाचे विष उत्तरवतो. मात्र हे चुकीचे आहे आणि ही अंधश्रद्धा आहे. यामुळे सर्पदंश झाल्यानंतर वैदु, बुवा, बाबा, भगत यांच्याकडे घेऊन जाऊ नये.

साप शोधण्यात वेळ वाया घालवू नका.

सापाला मारू नका. सापाला मारणे चुकीचे आहे. असे करताना साप दुसऱ्या व्यक्तीला देखील दंश करू शकतो.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! राज्यातील ‘या’ लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; 1 लाख 27 हजार शिधापत्रिका कायमच्या रद्दीत जमा होणार, कारण काय?

सर्पदंश झाल्यास काय करावे? 

सर्प दंश झाला की घाबरू नका, शांत रहा आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवा.

ज्याला सापाने चावा घेतला आहे त्याला धीर द्या. त्याला घाबरवू नका.

तसेच कोणत्या प्रकारचा साप चावला आहे याकडे लक्ष द्या. पण त्याला शोधत बसू नका. सापाला मारूही नका. साप घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात असेल तर तुम्ही सर्पमित्राला पाचारण करू शकता.

साप चावला आणि हाताला किंवा पायाला सूज आली तर अडचण येऊ नये म्हणून बांगड्या, अंगठी, घड्याळ काढून टाका.

तसेच सर्प दंश झालेल्या व्यक्तीला जास्त हालचाल करू देऊ नका.

जेव्हा खूपच अधिक गरज असेल तरच त्याला चालू द्या.

न्युरॉटोक्सिक म्हणजे विष असणारा साप आपल्याकडे सहसा नाग हा विषारी साप आढळून येतो. तो जर चावला असेल तर चावलेला भाग स्प्लिंट बांधून स्थिर करावा.

सर्पदंश झाल्यानंतर लगेचच, विनाविलंब रुग्णालयात साप चावलेल्या व्यक्तीला घेऊन जा.

सर्पदंश केव्हा झाला याची नेमकी वेळ लक्षात ठेवा आणि साप चावलाय त्या व्यक्तीच्या शरीरात काय बदल होत आहेत का? याकडे लक्ष ठेवा.

डॉक्टरांना सर्पदंशाबाबत योग्य आणि अचूक माहिती द्या. कोणता साप होता हे जर माहिती असेल तर डॉक्टर लोकांना याबाबत कल्पना द्या. 

हे पण वाचा :- टोमॅटो लागवड : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘या’ जातीची लागवड करा, 60 टनापर्यंत मिळणार उत्पादन

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe