पाऊस केव्हा आणि किती पडणार याबाबत पशु-पक्षी देतात ‘हे’ संकेत; वाचा याविषयी सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain News : गेल्या कित्येक दशकांपासून हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी अपडेटेड आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सॅटॅलाइटच्या माध्यमातून म्हणजेच उपग्रहाच्या माध्यमातून आता हवामानाचा अंदाज हवामान शास्त्रज्ञ सांगत आहेत.

हवामानाचा अचूक अंदाज शास्त्रज्ञांच्या माध्यमातून आता दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती कामांचे नियोजन करताना सोयीचे होत आहे. मात्र, यासोबतच गेल्या कित्येक वर्षांपासून निसर्गाच्या काही संकेतावरून देखील पावसाचे भाकीत आणि अंदाज वर्तवले जात आहेत.

विशेषतः निसर्गातील काही पक्षी पावसाचे संकेत देतात असं सांगितलं जातं. दरम्यान आज आपण पावसाचे संकेत कोणते पक्षी देतात आणि हे संकेत नेमके कोणते याबाबत जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- तुम्हाला जमिनीचा, जागेचा नकाशा हवा आहे का ? मग ‘या’ पद्धतीने 2 मिनिटात मोबाईलवरच मिळवा ऑनलाईन नकाशा, वाचा संपूर्ण प्रोसेस

कावळा :- खरंतर, पावसाळ्यापूर्वी कावळे घरटी बांधण्यास सुरुवात करतात. मात्र ही घरटे कावळे कोठे बांधतील यावरून पावसाळ्यात पाऊस कसा राहील याबाबत अंदाज लावले जातात. असं सांगितलं जातं की, जर कावळ्याने झाडाच्या मधोमध, तीन फांद्यांच्या बेचक्यामध्ये घरटे बांधले तर त्या पावसाळ्यात चांगला पाऊस होतो. तसेच झाडाच्या शेंड्यावर जर घरटे बांधले असेल तर मध्यम पाऊस होतो. परभणीचे हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील अशीच माहिती दिली होती. यासोबतच जर कावळ्याने वड, आंबा आणि पिंपळ यांसारख्या मोठ्या झाडांवर घरटी केली तर पाऊस चांगला राहतो आणि बाभूळ किंवा इतर काटेरी झाडांवर जर घरटी बांधली तर पाऊस कमी पडतो असे सांगितले जाते. तसेच जर कावळ्याने घरट्यामध्ये चार अंडी दिली तर चांगला पाऊस, तीन अंडी दिली तर त्यापेक्षा कमी पाऊस, दोन अंडी दिली तर त्यापेक्षा कमी पाऊस आणि एक अंडी दिली तर खूपच कमी पाऊस पडतो असे सांगितले जाते. विशेष म्हणजे जर कावळ्याने घरटे ऐवजी जमिनीवर अंडे दिले तर अभूतपूर्व दुष्काळ पडू शकतो असं सांगितलं जातं.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! राज्यातील ‘या’ लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; 1 लाख 27 हजार शिधापत्रिका कायमच्या रद्दीत जमा होणार, कारण काय?

चिमणी :- अलीकडे चिमण्यांची संख्या मोठी कमी झाली आहे. पण चिमणी हा पक्षी पर्यावरणासाठी खूपच महत्त्वाचा आहे. यामुळे याच्या संवर्धनासाठी नेहमीच पक्षी आणि प्राणी प्रेमींकडून प्रयत्न केले जातात. पण ही विलुप्त होत चाललेली चिमणी देखील पावसाचे संकेत देत असते. जर चिमणी मृग नक्षत्रामध्ये म्हणजेच जून महिन्याच्या सुरुवातीला धुळीमध्ये अंघोळ करत असेल म्हणजे चिमणी आपल्या अंगावर माती उडवत असेल तर ते चांगल्या पावसाचे संकेत असल्याचे सांगितले जाते. पंजाब डख यांनी याबाबतही माहिती दिली होती.

तितर :- तितर पक्षी जर आपल्या थव्यासोबत ‘कोड्यान केको कोड्यान केको’ असे आवाज करत असतील तर हे पावसाचे संकेत असते. मानवी वस्ती शेजारी जर या पक्षांचा गडबडगुंडा सुरू झाला तर हमखास पाऊस येतो असेही काही लोकांनी नमूद केले आहे.

चातक :- चातक हा आफ्रिकेतून भारत भूमीत स्थलांतरित होतो. हा पक्षी जर लवकर भारतात आला तर मान्सूनचे आगमन लवकर होते मात्र जर हा पक्षी उशीरां आला तर मान्सूनचे आगमन उशिराने होते असा अंदाज बांधला जात असतो.

पावसा पक्षी :- पावसा पक्षी जर पेरते व्हा, पेरते व्हा असा आवाज करू लागला की पावसाला सुरुवात होते असं सांगितलं जातं.  

हे पण वाचा :- टोमॅटो लागवड : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘या’ जातीची लागवड करा, 60 टनापर्यंत मिळणार उत्पादन