Snake Bite: साप चावल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू कसा होतो? शरीरात कशाप्रकारे पसरते विष? वाचा ए टू झेड माहिती

Published on -

Snake Bite:- साप म्हटले  तरी आपण घाबरायला लागतो किंवा आपल्या अंगावर भीती मुळे रोमांच उभे राहतात. त्यातल्या त्यात जर एखाद्या वेळेस साप आपल्याला समोर दिसूनच गेला तर आपल्याला पळता भुई थोडी होते. परंतु सापांच्या बाबतीत विचार केला तर जितका मनुष्य हा सापाला घाबरतो तितके साप देखील मनुष्याला घाबरत असतात. तसे पाहायला गेले तर बऱ्याच अंशी साप हे मानवी वस्तीमध्ये किंवा मानवी परिसरामध्ये सहसा आढळून येत नाहीत.

परंतु बऱ्याचदा घरांच्या अवतीभवती दगड किंवा माती तसेच इतर अस्वच्छता असेल तर अशा अडगळीच्या ठिकाणी निवारा म्हणून साप राहू शकतो. असे असले तरी एखाद्या वेळेस दुर्दैवाने व्यक्तीचा पाय सापावर पडला किंवा समोरच्या व्यक्तीकडून जीवाला धोका असल्याची जाणीव जेव्हा सापाला होते तेव्हाच साप हा चावा घेतो अशी साधारणपणे परिस्थिती आहे. त्या अनुषंगाने आपण या लेखांमध्ये साप चावल्यानंतर त्याचे विष शरीरात कसे पसरते व व्यक्तीचा मृत्यू कसा होऊ शकतो? इत्यादी बद्दल माहिती घेणार आहोत.

 सापाचे किती दात असतात विषारी?

जर आपण सापाचा विषाचा विचार केला तर त्याचा संपूर्ण जबडा हा विषारी नसतो तर त्या जबड्यातले फक्त चार दात विषारी असतात. साधारणपणे असे म्हटले जाते की सापाचे विष हे त्याच्या दातांमध्ये नाही तर त्याच्या डाव्या डोळ्याजवळ असलेल्या एका ग्रंथीमध्ये असते. जेव्हा सापाला काहीतरी धोका आहे असे वाटते किंवा तो चिडलेला असतो तेव्हाच त्याच्या या ग्रंथी मधील विष त्याच्या डोक्यातून धमणीच्या माध्यमातून दातांपर्यंत पोहोचते.

जर आपण पुराणांचा संदर्भ घेतला तर त्यानुसार साप चावल्यावर त्याचे विष मानवी शरीरामध्ये प्रवेश करते व जेव्हा ते शरीरात प्रवेश करते तेव्हा त्याचा वेग हा दुपटीने वाढतो. सापाचे विष रक्तात मिसळते तेव्हा त्याच्या वहनाचा वेग हा चौपट वाढतो. त्यामध्ये हा वेग आठपट, कफात 16 पटींनी तर वातात 30 पटींनी व मज्जा मध्ये हे वीष साठ पटींनी वेग घेते. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर विष शरीरामध्ये वेगाने पसरले तर वेळेत उपचार मिळणे खूप गरजेचे असते.

 सर्पदंशामुळे कसा होतो रुग्णाचा मृत्यू?

सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जेव्हा विष चढायला लागते तेव्हा ते सात टप्प्यामध्ये पसरते असे म्हटले जाते. जेव्हा शरीरामध्ये विष चढते तेव्हा त्या व्यक्तीच्या अंगावर रोमांच उभे राहतात. दुसरी पायरी म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरातून घाम यायला लागतो व तिसऱ्या टप्प्यांमध्ये त्याच्या हात पायास कंप सुटतो.

चौथ्या टप्प्यामध्ये व्यक्तीला ऐकू येण्याची क्षमता जी काही असते ती कमी होते व पाचवा टप्प्यात विषबाधा झालेल्या व्यक्तीला उचकी लागायला लागते. सहाव्या टप्प्यामध्ये व्यक्ती मान टाकतो तर सातव्या टप्पा हा अंतिम असून या टप्प्यावर व्यक्तीचा प्राण जाऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News