Snake Information: सापांची ‘ही’ प्रजात आहे अतिशय धोकादायक; देते थेट पिल्लांना जन्म, एक दिवसाचे पिल्लू चावले तरी असते धोकादायक

Published on -

Snake Information:- भारतामध्ये अनेक सापांच्या प्रजाती असून त्यामध्ये काही विषारी तर काही बिनविषारी आहेत. साधारणपणे साप हे अंडी घालतात व तसे पाहायला गेले तर सापांच्या जवळपास सर्वच प्रजाती अंडे घालतात व पिल्लांना जन्म देतात. परंतु सापांची एक प्रजात अशी आहे की ती अंडी घालत नाही आणि या प्रजातीच्या सापाची मादी अंडी देखील देत नाहीत.

तर त्या ऐवजी थेट माणसाप्रमाणे पिल्लांना जन्म देतात. विशेष म्हणजे या जातीचे एक दिवसाच्या सापाच्या पिल्लाने चावा घेतला तरी ते धोकादायक ठरू शकते. या सापाच्या प्रजातीचे नाव आहे रसेल वायपर होय व यालाच मराठीत आपण घोणस असे म्हणतो. भारतातील सापांच्या ज्या काही अति विषारी सापांच्या चार जाती आहेत त्या यादीमध्ये या प्रजातीचा समावेश होतो.

 रसेल वायपर( घोणस) जातीचा साप असतो धोकादायक

या क्षेत्रातील तज्ञ सांगतात की रसेल वायपर सापांमध्ये होमोटॉक्सिन आढळते. जर या प्रजातीच्या सापाने चावा घेतला तर त्याचे विष तुमच्या रक्त गोठवण्यास सुरुवात करते रक्ताच्या गुठळ्या शरीरामध्ये तयार व्हायला लागतात. एवढ्याच नाही तर शरीरातील उती आणि हाडे देखील कमजोर व्हायला सुरुवात होते.

या जातीच्या सापाने चावा घेतल्यानंतरजर तासभर उपचार मिळाला नाही तर व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो. त्या तुलनेत मात्र क्रेट आणि कोब्रा या सापांचे विष न्यूरोटॉक्सिन असते. या जातीच्या सापांनी चावा घेतला तर व्यक्तीच्या मज्जासंस्था निकामी होऊन मेंदू काम करणे बंद करतो.

 रसेल वायपर प्रजातीचे साप जन्मताच विषारी असतात

रसेल वायपर म्हणजेच घोणस जातीचे साप हे जन्म झाल्यानंतरच विषारी असतात. काही तासापूर्वी जन्मलेल्या रसेल वायपरने चावा घेतला तरी त्यातून मृत्यू होण्याची शक्यता असते.

तसेच हा एक भारतात आढळणारा एकमेव साप आहे जो अंडी घालण्याऐवजी थेट पिल्लांना जन्म देतो व या जातीचे नवजात पिल्ले देखील जन्मापासून विषारी असतात. अशा परिस्थितीमध्ये जर या पिल्लांनी चावा घेतला आणि वेळेवर उपचार मिळाला नाही तर मृत्यू निश्चित आहे असे समजावे.

रसेल वायपर म्हणजेच घोणस या प्रजातीच्या सापाची एक महत्त्वाची बाब म्हणजे भारतात ज्या काही सर्व प्रजातीचे साप आढळून येतात त्यापैकी रसेल वायपर प्रजातीच्या सापाचे दात सर्वात लांब म्हणजेच एक इंचापर्यंत असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe