Snake Interesting Facts:- साप म्हटले म्हणजे प्रत्येकाच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहतो. नुसता डोळ्यांना साप जरी आपल्याला दिसून आला तरी आपण सैरावैरा धावायला लागतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर सापाबद्दलची भीती आपल्या मनामध्ये असते. परंतु जर आपण सापांच्या बाबतीत पाहिले तर सापांच्या एकूण प्रजातींपैकी बहुसंख्य साप हे बिनविषारी आहेत.
भारतामध्ये चार प्रकारचे साप हे विषारी म्हणून ओळखले जातात. परंतु कुठल्याही प्रकारचा साप आपल्याला दिसला तरी आपण घाबरतो. परंतु विषारी सापांपासून माणसाला जास्त धोका असतो.

साप हा सरपटणारा प्राणी आहे हे आपल्याला माहिती आहे व सापाचे प्रकार देखील अनेक आहेत हे देखील आपल्याला माहिती आहे. परंतु सापाबद्दल अशा काही गोष्टी आहेत जे अजून बऱ्याच जणांना माहिती नाहीत. अशाच काही माहीत नसलेल्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
सापाच्या रक्ताचा रंग कसा असतो?
आता रक्त म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर पटकन लाल रंगाचे रक्त येते. अगदी याच पद्धतीने जगामध्ये जेवढ्या सापांच्या जाती आहेत तेवढ्या प्रजातींपैकी बऱ्याच सापांच्या रक्ताचा रंग हा लालच असतो. परंतु याला काही साप अपवाद असून काही सापांच्या रक्ताचा रंग हा पोपटी किंवा फिकट निळा असतो.
सापाचे रक्त थंड असते
सापाचे रक्त थंड असते हे जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर याकरिता तुम्हाला सस्तन प्राण्यांमधील व सरपटणाऱ्या प्राण्यांमधील प्रामुख्याने फरक समजून घेणे गरजेचे असते. सस्तन प्राण्यांमध्ये माणसाची देखील गणना होते व सस्तन वर्गातील प्राणी प्रामुख्याने गरम रक्ताचे असतात.
कारण सस्तन प्राणी स्वतःच्या शरीराचे तापमान स्वतः नियंत्रित करू शकतात. परंतु जर आपण साप किंवा पाल अशा काही सरपटणारे प्राण्यांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये त्या पद्धतीची क्षमता नसते. म्हणजे ते अशा पद्धतीची उष्णता स्वतःहून निर्माण करू शकत नाही. सरपटणारे प्राणी प्रामुख्याने आजूबाजूचे जे काही वातावरण असते
त्यामधून उष्णता घेत असतात. सापांचा विचार केला तर ते बहुतांशी जंगलामध्ये किंवा अंधाऱ्या जागेत राहतात व त्या ठिकाणी तापमान नेहमी कमी असते. त्यामुळे त्यांना पुरेशी उष्णता मिळवण्यास मदत होत नाही व हिवाळ्यात तापमान खूपच कमी झाले तर सापाच्या शरीराचे तापमान देखील खूप कमी होण्याची शक्यता असते. नाहीतर अशा पद्धतीने शरीराचे तापमान जर अचानक कमी झाले तर त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो.
ऋतूनुसार साप स्वतःचा बचाव कसा करतात?
थंडी किंवा उष्णतेपासून वाचण्याकरिता वेगवेगळ्या प्राण्यांची वेगवेगळी पद्धत असते. साधारणपणे बहुतेक प्राणी हिवाळा असेल तर ऊन मिळेल अशा ठिकाणी जातात किंवा अशा ठिकाणांचा शोध घेत असतात.
उन्हाळा असेल तर मात्र मोकळ्या जागेत राहून किंवा पाण्यात डुंबून ते स्वतःचा बचाव करतात. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा साप किंवा पालीसारखे प्राणी मोकळ्या जागेमध्ये बसलेली दिसून येतात व या पद्धतीला सन बास्किंग असं देखील म्हटले जाते.
साप किती काळ झोपतात?
साप झोपतात का हा एक मोठा प्रश्न बऱ्याचदा आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात आला असेल. याचे उत्तर जर पाहिले तर ते हो असेच आहे. आठवडाभर झोपतात परंतु काही साफ तर महिन्याभर देखील झोपतात. आपण काही माहितीचा आधार घेतला तर कमी तापमान असल्यामुळे सापांची जी काही चयापचय क्रिया असते ती देखील मंदावत असते.
त्यामुळे सापांना वेगाने धावण्यास देखील समस्या निर्माण होतात त्यामुळे ते बराच वेळ झोपूनच राहतात. जर आपण थंड रक्ताच्या प्राण्याचा विचार केला तर ते प्रामुख्याने डायनासोरच्या कालावधीपासून या पृथ्वी तलावर आहेत.
परंतु इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिले तर अशा प्राण्यांना म्हणजेच ज्या प्राण्यांचे रक्त थंड आहे अशा प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी खूप कमी प्रमाणावर अन्न लागते. त्यामुळे सापांच्या अनेक प्रजाती न खाता देखील महिनोमहिने किंवा वर्षभर देखील जिवंत राहू शकतात.