रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा वापर होतो ? याची नशा किती दिवस टिकते ? सापाच्या विषाचा बाजार कसा चालतो ? वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:

सध्या बिग बॉस या रीऍलिटी शो मधून प्रसिद्ध झालेला युट्युबर एलव्हिश यादवचे प्रकरण सुरू असून त्यावर फार्म हाऊस मध्ये जिवंत सापांसोबत व्हिडिओ शूट करण्याचा आरोप आहे. तसेच होणाऱ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये नशा करिता सापांच्या विषाचा वापर केला जातो.

या प्रकरणांमध्ये आतापर्यंत पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून नऊ विषारी साप आणि विष जप्त करण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आलेली असून एल्वीश यादव हा सापाचं विष आणि जिवंत साप घेऊन नोएडा येथील फार्म हाऊस मध्ये रेव्ह पार्टी आणि व्हिडिओ शूट करतो व त्या ठिकाणी परदेशी तरुणींना बोलावलं जातं.

त्यामध्ये सहसा सापाचं विष तसेच इतर नशा आणणाऱ्या पदार्थांचे सेवन केलं जातं अशा प्रकारचा आरोप त्याच्यावर आहे. परंतु या प्रकरणाच्या माध्यमातून सापाच्या विषाचा वापर हा नशा करण्यासाठी केला जातो हा मुद्दा पुढे आलेला आहे.

त्यामुळे सापाच्या विषाचा वापर नशा करण्यासाठी कसा केला जातो? हा एक मोठा प्रश्न आहे. त्याबद्दलचीच महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.

नशा करण्यासाठी सापाच्या विषाचा वापर

जर आपण नशा करण्यासाठी सापाच्या विषाचा वापरचा इतिहास पाहिला तर नशा करण्यासाठी सर्पदंशाचे जे काही प्रकार आहेत ते चीन, रशिया आणि पाश्चिमात्य देशांमध्ये अनेक वर्षांपासून केले जात आहेत भारतामध्ये देखील हे प्रकार सध्या वाढीस लागत आहेत.

भारतातील विषारी सापांचा विचार केला तर सध्या चीन तसेच रशिया आणि फ्रान्समधून अशा सापांना खूप मोठी मागणी आहे. तसेच परदेशातील काही व्यक्ती साप पाळण्याचा छंद देखील बाळगतात.

तसेच सापाची तस्करी हा एक मोठा प्रश्न असून अनेकदा असे सापाच्या तस्करी करणारे रॅकेट्स देखील उघडकीस आले आहेत. अनेक पार्ट्यांच्या माध्यमातून सर्पदंशातून नशा करण्याचे प्रकार वाढीस लागत असून दिवसेंदिवस हे प्रकरण वाढतच आहे.

सापाच्या विषाची नशा का केली जाते?

याबाबत जर मिळालेल्या माहितीचा विचार केला तर बऱ्याच व्यक्तींना मॉर्फीन किंवा अफू सारख्या मादक पदार्थांचा वापर नशेसाठी करण्याचे व्यसन लागलेले असते. परंतु वारंवार त्यांचं सेवन केल्यामुळे अशा पदार्थांमधून होणारी नशा दिवसेंदिवस कमी होत जाते व कालांतराने नशा मिळणे बंद होते.

त्यामुळे आणखीन नशा करण्यासाठी काही व्यक्ती धोकादायक अशा पदार्थांकडे वळतात वेगवेगळे पर्याय अवलंबतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे सापाचे विष हे होय. या प्रकारामध्ये काही लोक पार्ट्यांमध्ये सापाची पिल्ले ठेवतात व त्यांना त्रास देऊन त्यांच्या दंशातून नशा किंवा आनंद मिळवतात.

कोणत्या सापांचा नशासाठी वापर केला जातो?

जर आपण याबाबत नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनचा अहवाल पाहिला तर त्यानुसार भारतातील नशेचे जे काही व्यसनाधीन व्यक्ती आहेत त्यांच्याकडून प्रामुख्याने सर्वाधिक वापर हा कोब्रा,

बंगारस कॅर्यूलस म्हणजेच कॉमन क्रेट आणि ग्रीन स्नेक व नाजा नाजा यांचा वापर केला जातो. ज्या कुणाला कमी विषारी सापांची नशा हवी असते असे व्यक्ती रॅट स्नॅक आणि ग्रीन बेल स्नेक या सापांची विष दारू सोबत घेण्यास पसंती देतात.

जगात सापाच्या विषाचा बाजार कशा पद्धतीने चालतो?

यानुसार विविध स्त्रोतांनुसार विचार केला तर कोब्रा जातीच्या सापाच्या एक ग्राम विषाची किंमत 4000 ते 26 हजार रुपयांपर्यंत असते. या किमती प्रामुख्याने कोब्रा किती विषारी आहे यावरून ठरत असतात. जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर यामध्ये किमतीत आणखी वाढ होऊ शकते.

उदाहरणच घ्यायचे झाले तर एक ग्रॅम सापाचे विष 150 डॉलर म्हणजे दहा हजार रुपयांना विकले जाते. किंग कोब्रा या विषारी सापाच्या एक गॅलन विष हे एक लाख 53 हजार डॉलर इतक्या किमतीत विकले जाते. या सर्व किमती बेकायदेशीरित्या तस्करी करून मिळवलेल्या सापाच्या विषाच्या आहेत.

यामध्ये जगभरात कायदेशीर आणि बेकायदेशीरपणे विषाचा व्यापार चालतो. परंतु यामध्ये कायदेशीर रित्या सापाच्या विषाचा वापर हा औषधे बनवण्यासाठी केला जातो.

भारताचा विचार केला तर भारतामध्ये सापांची अवैध तस्करी रोखण्यासाठी भारतीय वन्यजीव( संरक्षण) कायदा 1972 आणि परकीय व्यापार( विकास आणि नियमन ) कायदा 1992 ही दोन कायदे सापांची अवैध तस्करी रोखण्यासाठी आहेत.

जगभरातील सापांचे या चार गटात वर्गीकरण होते

1- एलापीडस- या गटातील सापांचे तोंड मोठे असते व सहजतेने ते शिकार पकडतात. यांचे दोन पुढचे दात टोकदार असतात व हे फणा काढतात. कोब्रा हे या गटातील सापाचे उदाहरण आहे.

2- कोलुब्रिड्स- या गटातील सापाचे डोळे डोक्याच्या मागे असतात. हा सापांचा सर्वात मोठा परिवार असून याचे दात टोकदार असतात. या गटातील बहुतेक साप बिनविषारी असतात.

3- वॅपरीडस- या गटातील सापांचे संपूर्ण शरीर खवल्यांनी म्हणजेच स्केल झाकलेले असते. या प्रजातीच्या काही सापांमध्येच विष असते व दाते टोकदार असतात. या गटामध्ये वायपर तसेच राजा साप इत्यादी सापांच्या प्रजातींचा समावेश होतो.

4- हायड्रोफिनी- या गटामध्ये आफ्रिकन ब्लॅक मांबा या गटातील साप तसेच समुद्री किंवा त्याच्या आसपासच्या आढळणारे सापांचा समावेश होतो. गटामध्ये प्रामुख्याने 231 प्रकारचे साप आढळून येतात व केवळ काही साप यामध्ये विषारी असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe