Snake Viral News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय. पश्चिम महाराष्ट्र, कोकणसहीत मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाची तीव्रता वाढत आहे. पाण्याची तीव्रता वाढत चालली असल्याने आता सापांच्या बिळामध्ये पाणी घुसू लागले आहे आणि यामुळे साप बिळाबाहेर पडत आहेत.
खरंतर भारतात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. एका अनाधिकृत आकडेवारीनुसार देशात जवळपास 90 हजाराहून अधिक लोक साप चावल्यामुळे मृत्युमुखी पडतात.

पावसाळा सुरू झाल्यानंतर आपल्या घराच्या आजुबाजूसही हिरवेगार गवत दिसून येते. यामुळे साप अशा गवताळ ठिकाणी अन्नाच्या शोधात येतात आणि घरात सुद्धा घुसू शकतात.
दरम्यान जर तुम्हालाही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप घरात घुसू शकतात अशी भीती वाटत असेल तर आजची बातमी कामाची राहणार आहे.
खरंतर साप निसर्गात आढळणाऱ्या काही औषधी वनस्पती पासून कायम लांब राहतात. दरम्यान आज आपण अशाच दोन वनस्पतींची माहिती जाणून घेणार आहोत.
या वनस्पती पासून साप नेहमी लांब राहतात
लसूण : लसूण हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. शिवाय ही एक औषधी वनस्पती देखील आहे. यामुळे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लसणाची लागवड केली जाते. देशातील अनेक शेतकरी लसूणची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत.
दरम्यान लसूण ही अशी वनस्पती आहे जिचा गंध सापांना अजिबात आवडत नाही. यामुळे जर तुम्ही ही वनस्पती तुमच्या घराशेजारी लावली तर साप तुमच्या घराच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीत.
पुदिना : पुदिना ही देखील अशी एक वनस्पती आहे जिचा गंध सापांना आवडत नाही. असं म्हटलं जातं की घराच्या अंगणात किंवा परसबागेत या वनस्पतीची लागवड केली तर अशा ठिकाणी जात नाही.
त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या घरात साप घुसेल अशी भीती वाटत असेल तर तुम्ही ही वनस्पती लावू शकता. पुदिना ही देखील अशीच एक औषधी वनस्पती आहे.
हिचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. अनेकजण चहा मध्ये देखील या वनस्पतीचा वापर करतात. या औषधी वनस्पती मध्ये असणारे घटक अनेक आजारांमध्ये प्रभावी ठरतात.