Snake Viral News : सध्या पावसाळा सुरू आहे आणि दरवर्षी पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना वाढत असतात. यामुळे या दिवसांमध्ये विशेष सावधानता बाळगणे आवश्यक आहे. खरंतर भारतात सापाच्या शेकडो प्रजाती आढळतात मात्र यापैकी काही बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी आहेत.
पण तरीही देशात सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. यामुळे सापांपासून नेहमीच लांब राहिले पाहिजे. साप दिसला म्हणजे त्याला मारायला जाऊ नये, कारण साप हा असा प्राणी आहे ज्याची पर्यावरणाला फारच गरज आहे.

खरं तर आपल्यापैकी अनेक जण साप दिसला तरी घाबरतात , पण निसर्गात आढळणाऱ्या काही प्राण्यांना सापही घाबरतो. दरम्यान आज आपण अशा पाच-सहा प्राण्यांची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांना साप प्रचंड घाबरत असतो.
हे प्राणी सापांनाही मारू शकतात
हेजहॉग : हा असा प्राणी आहे जो सापांना घाबरत नाही. या प्राण्याचे तीक्ष्ण दात आणि मणके या प्राण्यांना सापांच्या चाव्या पासून वाचवतात. हा प्राणी लहान सापांना सहज मारू शकतो. या प्राण्यांमध्ये सापांच्या विषाविरोधात प्रतिकारशक्ती आढळते.
गरुड : गरुड च्या विविध प्रजाती आढळतात त्यातील सर्प गरुड आणि सोनेरी गरुड सापांना मारू शकतात. अविश्वसनीय दृष्टी, तीक्ष्ण नखे यांचा वापर करून गरुड सापांवर हवाई हल्ले करतात आणि जमिनीवरून साप पकडतात. हे प्राणी हवेतच सापांना चिरडण्याची क्षमता ठेवतात.
सेक्रेटरी बर्ड : हा एक आफ्रिकन शिकारी पक्षी आहे जो की सापांना मारण्याची क्षमता ठेवतो. हा शिकारी पक्षी आपल्या पायांनी सापांना चिरडतो. या प्राण्याचे लांब पाय सापांची शिकार करण्यासाठी त्यांच्या उपयोगाचे ठरतात. हा पक्षी कोब्रा साप मारण्याची क्षमता ठेवतो.
हनी बॅजर : हा एक जाड त्वचेचा प्राणी आहे. हा प्राणी आपल्या नखांनी आणि दातांनी साप मारून टाकतो. या प्राण्यात सापांच्या विषा विरोधात प्रतिकारक शक्ती आढळते.
मुंगुस : मुंगूस आणि साप यांच्यातील लढाई आपण साऱ्यांनी पाहिली असेल. मुंगूस आणि साप यांच्यात नैसर्गिकरीत्या दुश्मनी आहे. मात्र साप बहुतांशी वेळा मुंगसापासून हरतो. मुंगूस सापांना लढाईत हरवतो आणि अनेकदा सापांना मारून टाकतो. या प्राण्यात देखील सापांच्या विषा विरोधात लढण्यास आवश्यक गुणधर्म आढळतात.