Snake Viral News : पावसाळ्यात दरवर्षी सर्पदंशाच्या घटना वाढतात. कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बिळात पाणी शिरते आणि यामुळे साप आसरा घेण्यासाठी मानवी वस्तीकडे वळतात. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसात साप चावण्याचे प्रमाण वाढते.
दुसरीकडे उन्हाळ्यात सुद्धा अन्नाच्या शोधात साप बाहेर पडतात अन यामुळे उन्हाळ्यातही अनेकजण सर्पदंशाने दगावतात. एका आकडेवारीनुसार भारतात सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या तब्बल 70 ते 80 हजाराच्या घरात आहे.

यामुळे साप दिसला तरी आपण घाबरतो. खरे तर आपल्या भारताच्या विविध प्रजाती आढळतात. भारतात सापांच्या शेकडो प्रजाती आहेत आणि यातील बहुसंख्य प्रजाती या बिनविषारी आहेत. आपल्याकडील अगदीच बोटावर मोजण्या इतक्या प्रजाती विषारी आहेत.
मात्र तरीही देशात सर्पदंशाने मरण पावणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. अशा परिस्थितीत आज आपण देशातील कोणत्या राज्यांमध्ये सापांचे प्रमाण सर्वात जास्त? कोणत्या राज्यात सर्वाधिक साप आढळतात याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या राज्यांमध्ये आढळतात सर्वात जास्त साप
खरंतर भारतात सर्वदूर साप आढळून येतात. सर्वच राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे साप आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे कोणत्या राज्यात सर्वाधिक साप आहेत याबाबतचा अंदाज बांधणे थोडी कठीणच आहे. मात्र असे असले तरी देशातील काही राज्ये सापांच्या लोकसंख्येच्या उच्च विविधतेसाठी ओळखली जातात.
आज आपण याच राज्यांची माहिती पाहणार आहोत. पश्चिम घाट विशेषत: केरळ आणि कर्नाटक येथे तुम्हाला विविध जातींच्या सापांचे वास्तव्य पाहायला मिळेल. या ठिकाणी असणाऱ्या सापांची संख्या फारच अधिक आहे.
कर्नाटकातील अगुंबे येथे कोब्रा या सापाची संख्या फारचं अधिक आहे. याला ‘कोब्रा कॅपिटल ऑफ इंडिया’ ही पदवी सुद्धा देण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये सुद्धा सापांची संख्या फारच अधिक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये सापांच्या जवळपास 30 हुन अधिक प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. ज्यात अनेक विषारी प्रजातींचा समावेश सुद्धा आहे, जे की या राज्यातील सापांची जैवविविधता दर्शवते.
ईशान्येकडील राज्यांचाही होतो समावेश
ईशान्येकडील राज्ये विशेषत: नागालँड आणि मेघालय येथेही सापांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. असं म्हणतात की ईशान्य कडील नागालँडमध्ये 65 प्रजातींचे निवासस्थान आहे. मेघालयात देखील विविध सापांच्या प्रजाती पाहायला मिळतात. ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक विषारी प्रजाती आपल्याला दिसतात.
मध्य भारतातही सापांची संख्या अधिक
मध्य भारतात विशेषतः मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि झारखंड सारख्या राज्यांमध्येही सापांच्या विविध प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात आणि इथेही सापांची संख्या फार कधीच आहे. मध्य भारतातील अनुकूल वातावरण सापांसाठी पोषक आहे, येथील अधिवासात सापांच्या विविध प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात.