सोलापूरच्या शेतकरी पुत्राचा शाही थाट! लग्नाची वरात काढली थेट हत्तीवरून; अख्या जिल्ह्यात रंगली शाही वरातीची चर्चा

Solapur News : आपल्याकडे हौसेला काही मोल नसतं असं म्हटलं जात. याची प्रचिती देखील अनेकदा आली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राने असं काही केलं आहे की त्यांच्या हौसेच मोल मापताच येणार नाही. खरं पाहता आपल्या महाराष्ट्रात लग्नाची नवरदेवाची वरात घोड्यावरून किंवा घोड्याच्या रथावरून काढण्याची परंपरा आहे. तसं पाहता प्रत्येक मैलाला महाराष्ट्रातील परंपरेत मोठा बदल पाहायला मिळतो.

लग्न सोहळ्यातील विधी अन परंपरेमध्ये देखील बदल आहे. मात्र लग्नाची वरात ही घोड्यावरून, कारमधून, खेचरावरून, बैलगाडीतून अशीच आपण आतापर्यंत पाहिले असेल तसच ऐकल असेल. पण सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राची वरात थेट हत्तीवरून म्हणजे गज वरून काढण्यात आली आहे. यामुळे या वरातीची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

हत्तीवरून वरात काढत शेतकरी पुत्राने शाही पद्धतीने लग्नाच्या वरातीचा सोहळा पार पाडला असून या शाही सोहळ्याची भुरळ अनेकांना पडली आहे. जिल्ह्यातील उंदरगाव येथील रामदास नाईकवाडे या शेतकऱ्याने आपल्या मुलाचं लग्न रुबाबात पार पडावं, अगदी राजा महाराजांसारखं त्याला शाही वैभव लाभाव असं स्वप्न पाहिलं. यासाठी पैशांची जमवाजमव केली. आणि आपल्या मुलाच्या लग्नाची वरात थेट हत्तीवरूनच काढली.

ऐरावतवर आतापर्यंत आपण इंद्रदेवाला विराजमान झालेलं ऐकलं आहे पण सोलापूर मध्ये प्रथमच नवरदेव हत्तीवर विराजमान होऊन लग्न मंडपाकडे जाताना पाहिला आहे. माढा तालुक्यातील उंदरगाव येथील रामदास नाईकवाडे यांच्या पुत्राची हत्तीवरील वरात सध्या उंदरगाव परिसरात मोठ्या चर्चेचा विषय आहे. विशेष म्हणजे या शेतकरी बापाने आपल्या पुत्रासाठी काढलेल्या या शाही वरातीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अनेकांनी या वरातीचे फोटो आपल्या मोबाईल मध्ये कैद करून या अनोख्या सोहळ्याला दाद दिली आहे. निश्चितच शेतकरी कधी काय करतील याचा काही नेम नाही. बळीराजा हा असंख्य संकटांनी घेरला गेला आहे पण आजही तो राजाच आहे हे या निमित्ताने बोलले जाऊ लागले आहे. निश्चितच या शेतकऱ्याने आपल्या पुत्रांच्या हौसेपुढे हौसेला काही मोल नसतं हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

जरी शेतकऱ्यांवर हजारो संकटे आली तरी शेतकरी न खचता या संकटाचा यशस्वी मुकाबला करत एक दिवस यशस्वीच होईल, आपल्या आनंदाचा तो असाच जश्न करेन हे आपल्या उपक्रमातून या सोलापूर जिल्ह्यातील उंदरगाव या छोट्याशा गावातील शेतकरी बापाने दाखवून दिले आहे. सध्या या शाही सोहळ्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून शेतकरी बापाच आपल्या मुलावर किती प्रेम असत हे आज समाजाने आपल्या डोळ्यांनी पाहिल आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe