Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम फारसा फायदेशीर राहिलेला नाही. खरं पाहता, यंदाच्या हंगामात सुरुवातीला सोयाबीनला अपेक्षित असा दर मिळाला नव्हता. मध्यतरी मात्र सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतची सरासरी भावपातळी सोयाबीन ने गाठली होती. विशेष म्हणजे कमाल बाजार भाव साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक नमूद केला गेला होता. मात्र हा दर अधिक काळ टिकू शकला नाही.
सध्या स्थितीला सोयाबीन 4900 ते 5,100 दरम्यान विक्री होत आहे. मात्र जाणकार लोकांनी सोयाबीन दर वाढीसाठी पोषक परिस्थिती असल्याचा दावा केला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव सोयाबीन विक्रीसाठी हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे. मात्र यावर्षी सोयाबीनला गेल्या वर्षी प्रमाणे विक्रमी दर मिळणार नसल्याचे चित्र आहे.

यंदा सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर सोयाबीनला मिळू शकतो असा अंदाज मात्र जाणकार लोक बांधत आहेत. आता भविष्यात सोयाबीनला काय भाव मिळतो यावरच सोयाबीन उत्पादकांचे उत्पन्न अवलंबून राहणार आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 54 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमुद करण्यात आला आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 10 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 2300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5041 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 4900 रुपये प्रति क्विंटल एवढा नमुद करण्यात आला आहे.
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 23 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5050 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमुद करण्यात आला आहे.
समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 35 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5030 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5150 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5030 रुपये प्रति क्विंटल एवढा नमुद करण्यात आला आहे.