Soybean Farming Kharif Season Tips : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात-जीव आला आहे. आता शेतकरी बांधव खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात व्यस्त आहेत.
तीन दिवसांपासून मात्र तापमानात वाढ झाली असल्याने खरिपाची तयारी करताना शेतकऱ्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र तरीही बळीराजा मोठ्या हिमतीने या कडाक्याच्या उन्हात शेतशिवारामध्ये जमिनीची पूर्व मशागत करताना नजरेस पडत आहे.
खरं पाहता खरीप हंगाम मात्र एका महिन्याच्या कालावधीवर आला आहे. एका महिन्यात आता खरीप हंगामाची पेरणीची तयारी सुरू होणार आहे. खरीप हंगामात शेतकरी सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करतात.
सोयाबीनची पेरणी मराठवाडा आणि विदर्भ या विभागात सर्वाधिक केली जाते. दरम्यान आज आपण सोयाबीन पिकातून विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी कोणती कामे केली पाहिजेत याबाबत तज्ञांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- CBSE 12वी चे निकाल लागले; महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी अन 12वीचे निकाल केव्हा? पहा डिटेल्स
कृषी विभागाच्या मते सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करावी. ज्या बियाण्यांची उगवण क्षमता ही उत्तम असेल अशाच बियाण्याची पेरणी शेतकऱ्यांनी करावी जेणेकरून सोयाबीन पिकातून विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांना मिळवता येईल. आता तुम्हाला बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी कोणती पद्धत वापरायची हा प्रश्न पडलेला असेल.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता तपासण्यासाठी एक कागद घेऊन त्याच्या चार घड्या पाडाव्यात. असे एकूण 10 कागदं घ्या आणि प्रत्येकाच्या चार घड्या पाडा. नंतर हे कागद पाण्याने ओले करा आणि प्रत्येकी १० बिया या कागदात घ्या. म्हणजे १०० बियांच्या १० गुंडाळ्या तयार होतील.
या पुड्या पॉलिथिन पिशवीत चार दिवस तशाच ठेवा. चार दिवसांनंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बिजाकंकृत झालेल्या बिया मोजाव्यात. जर अंकुरित झालेल्या बियाण्यांची संख्या 80 असेल तर 80 टक्के उगवण क्षमता त्या बियाण्याची आहे असे समजावे. बियाण्याची उगवण क्षमता तपासण्या सोबतच पेरणी करताना देखील काही गोष्टींची काळजी घेणे जरुरीचे आहे.
यात सोयाबीन बियाणे पेरणी करताना तीन ते चार सेंटीमीटर खोलीवर पेरणी करणे जरुरीचे आहे. तसेच सोयाबीन बियाणे टोकन पद्धतीने किंवा प्लॉन्टरच्या सहाय्याने रुंद वरंबा सरी पध्दतीने म्हणजे बी बी एफ यंत्राने पेरणी करावी. असे केल्यास कमी सोयाबीन बियाणे लागेल आणि उत्पादनात देखील वाढ होते.
हे पण वाचा :- मुली वडिलांच्या मालमत्तेवर केव्हा दावा करू शकतात? कायदा सांगतो की….