अरेरे…! सोयातेलाची आयात वाढली; आता सोयाबीन दरात वाढ होणार नाही का? वाचा काय म्हणताय बाजार अभ्यासक

soybean market

Soybean Market : महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. प्रमुख तेलबिया पीक म्हणून या पिकाची शेती अलीकडे वाढली आहे. सोया तेलाचा वापर आपल्या देशात मुबलक प्रमाणात होत असल्याने तसेच सोया पेंड निर्यात देशातून विक्रमी होत असल्याने या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. पण यंदाच्या हंगामात सोयाबीन लागवड शेतकऱ्यांसाठी अपेक्षित अशी लाभप्रद सिद्ध झालेली नाही.

खरं पाहता सोयाबीनपासून प्रामुख्याने दोन बायप्रोडक्टची निर्मिती होते. सोया तेल आणि सोया पेंड हे ते दोन बायप्रॉडक्ट आहेत. आणि प्रत्यक्षात सोयाबीन खरेदीचे दर हे या दोन प्रोडक्टला बाजारात कशी मागणी आहे, या दोन प्रॉडक्टला बाजारात किती दर मिळत आहे यावरच अवलंबून असतात. सोयातेल व्यतिरिक्त इतर खाद्यतेल दराचा ही यावर परिणाम पाहायला मिळतो.

दरम्यान आता साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने देशात विक्रमी खाद्यतेलाचीं आयात झाल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या तीन महिन्यात देशात मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाचीं आयात झाली असल्याने याचा फटका प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक आणि मोहरी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्याशिवाय देशातील रिफायनरी उद्योग देखील यामुळे संकटात सापडले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर ते जानेवारी या काळात भारताची खाद्यतेल आयात ३१.५६ टक्क्यांनी वाढली आहे.

यामध्ये सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल मोठ्या प्रमाणात आयात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांमध्ये भारतात ४७ लाख ४६ हजार टन खाद्यतेल आयात करण्यात आलं आहे. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी या काळात ३६ लाख टन आयात करण्यात आली होती. म्हणजेच जवळपास दहा लाख टनाहून अधिक खाद्यतेलाचीं आयात या तीन महिन्यात झाली आहे. खाद्यतेलाची विक्रमी आयात होत आहे शिवाय देशात देखील सोयाबीन गाळप सुरूच आहे.

यामुळं खाद्यतेलाचा साठा देशांतर्गत मुबलक प्रमाणात आहे. मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारीपर्यंत ३२ लाख २३ हजार टन खाद्यतेलाचा साठा देशात होता. आता यामध्ये वाढ देखील झाली असेल. यामुळे निश्चितच खाद्यतेल आयातीमुळे खाद्यतेलाच्या दरात तेजी येत नसल्याचे सांगितले जात आहे. विशेषता सोया तेलाचे दर यामुळे दबावात आहेत. सोया तेलाचे दर दबावात असल्याने याचा सरळ परिणाम सोयाबीन दरावर होतो.

यामुळे सध्या देशांतर्गत सोयाबीन दर मंदीमध्ये आहेत. दरवाढीसाठी पूरक परिस्थिती असताना देखील सोयातेल दरातील मंदीमुळे सोयाबीनचे दर वधारत नसल्याचे काही जाणकारांनी नमूद केले आहे. अशा परिस्थितीत सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर शुल्क वाढवण्याची गरज काही तज्ञ लोकांकडून वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे रिफायनरी उद्योगाकडून देखील ही मागणी जोर धरत आहे.

देशात मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाचीं आयात वाढली असल्याने देशांतर्गत वसलेले उद्योग यामुळे प्रभावित होत असून आता उद्योगाकडून आयात शुल्क वाढवण्याची गरज असल्याचे मत नमूद केले जात आहे. निश्चितच जर सरकारने आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला तर याचा दिलासा उद्योगांसह शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र असे असले तरी सोयाबीन दरवाढीसाठी इतरही घटक कारणीभूत ठरणार असून दरवाढीसाठी पोषक परिस्थिती असल्याचा दावा जानकरांनी ठोकला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe