Soybean Market Price : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता तूर्तासं सोयाबीन दर दबावात असले तरीदेखील आगामी काही दिवसात सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तज्ञ लोकांच्या मते, भारतातून मोठ्या प्रमाणात सोया पेंड निर्यात होण्याची शक्यता लक्षात घेता आणि जागतिक बाजारातील सोयाबीन दरातील तेजी पाहता येत्या काही दिवसात सोयाबीनचे दर देशांतर्गत वाढतील.
मात्र असे असले तरी यंदाच्या हंगामात गेल्या हंगामाप्रमाणे सोयाबीन दरात तेजी राहणार नाही. गेल्या हंगामात सोयाबीन सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या विक्रमी भाव पातळीवर विक्री झाला होता. यंदा मात्र तशी परिस्थिती राहणार नसून सोयाबीनला पाच हजार पाचशे ते सहा हजार दरम्यान भाव यावर्षी मिळणार आहे.
तूर्तास मात्र सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी आहेत. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. शेतकरी बांधवांच्या मते, यंदाच्या हंगामात अतिवृष्टीमुळे त्यांना नेहमीच्या तुलनेत सोयाबीनचे खूपच कमी उत्पादन मिळाले आहे. शिवाय सोयाबीन पीक उत्पादित करण्यासाठी अधिकचा खर्च त्यांना आला आहे. यामुळे उत्पादन खर्च आणि त्यांची अंग मेहनत याचा विचार करता 6000 रुपये प्रति क्विंटल हा दर देखील त्यांना परवडणारा नाही.
अशा परिस्थितीत सध्या तर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात सोयाबीन विक्री होत आहे. यामुळे यंदाच्या हंगामात पदरमोड करून शेतकऱ्यांना सोयाबीनचा उत्पादन खर्च भागवण्याची वेळ आली आहे. दरम्यान आता तज्ञ लोकांनी सोयाबीन बाजारात तेजी येणार असल्याची भविष्यवाणी केली असल्याने निदान सोयाबीन पिकासाठी आलेला खर्च तरी भरून निघेल अशी आशा सोयाबीन उत्पादकांना आहे.
अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारात आज सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी जाणून घेणार आहोत. आजचे सोयाबीन बाजार भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.