शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सोयाबीन दरात झाली वाढ, पहा बाजारात काय सुरु आहे?

Soybean Market Price

Soybean Market Price : येत्या दीड महिन्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पूर्वतयारी देखील सुरू केली आहे. दरम्यान आता राज्यातील सोयाबीन उत्पादकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे सोयाबीन दरात किंचित वाढ झाली आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

वास्तविक या हंगामात किमान सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर सोयाबीनला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र प्रत्यक्षात दर पाच हजार ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल एवढाच मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत असून काही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने सोयाबीनची साठवणूक करून ठेवली आहे.

हे पण वाचा :- याला म्हणतात मल्टिबॅगर स्टॉक ! 12 रुपयाचा ‘हा’ स्टॉक पोहोचला 106 रुपयांवर, गुंतवणूकदार झालेत मालामाल; स्टॉकची ए टू झेड माहिती वाचा

अजूनही जवळपास 50 ते 60% शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून आहे. मात्र बाजारात सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री ऐवजी साठवणुकीवर भर दिला आहे.

मात्र आता दरात किंचित वाढ झाली असल्याने आगामी काळात सोयाबीन बाजारात दाखल होईल अशी शक्यता आहे. विदर्भातील वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दरात वाढ झाली आहे.

या बाजारात 4,450 ते 5200 दरम्यान सोयाबीन विक्री झाला आहे. निश्चितच हा देखील भाव शेतकऱ्यांच्या अपेक्षेएवढा नाही. शेतकऱ्यांच्या मते या बाजारभावात सोयाबीन विकला तर त्यांना उत्पादन खर्च देखील भरून काढता येणार नाही.

हे पण वाचा :- अहमदनगर, नासिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह ‘या’ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; भारतीय हवामान विभागाचा अलर्ट

पण वासिम एपीएमसीमध्ये शनिवारी झालेल्या लिलावात दर वाढ झाली असल्याने आगामी काळात आणखी भाव वाढतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.

वास्तविक वाशिम जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण हे सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून आहे. अशातच आता येत्या दीड महिन्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांना पैशांची निकड भासणार असून आता शेतकऱ्यांना नाईलाजास्तव सोयाबीनची विक्री करावी लागणार आहे. परंतु या हंगामात सोयाबीनला कमी दर मिळाला असल्याने पुढील हंगामात सोयाबीनचे क्षेत्र घटनार असे मतही व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- पंजाब डख यांचा तातडीचा मेसेज; आज आणि उद्या ‘या’ जिल्ह्यात गारपीट होणार, पहा संपूर्ण हवामान अंदाज

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe