Soybean Price : दिलासादायक! सोयाबीन दरात वाढ; पण….

Published on -

Soybean Price : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोयाबीन दरात पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. खरं पाहता गेल्या दोन महिन्यांपासून सोयाबीन दर दबावत होते. राज्यात सोयाबीनला मात्र पाच हजार रुपये प्रति क्विंटल च्या आसपास दर मिळत होते. मात्र आता परिस्थिती हळूहळू बदलू लागली आहे.

सोयाबीनच्या दरात 100 ते 200 रुपयांची तेजी आली आहे. सोयाबीनला 5300 ते 5400 प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव सध्या मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत सध्या मिळत असलेला दर हा 100 ते 200 रुपये प्रति क्विंटल ने अधिक आहे.

मात्र शेतकऱ्यांच्या मते, सध्या मिळत असलेला बाजार भाव हा त्यांच्यासाठी परवडणारा नसून अजून दरात वाढ होणे अपेक्षित आहे. जाणकार लोकांनी देखील दरवाढीचा ट्रेंड असल्याचे मत व्यक्त केला आहे. तज्ञ लोकांच्या मते सध्या मिळत असलेल्या दरात येत्या काही दिवसात अजून वाढ होणार आहे. सोयाबीनला या हंगामात 5500 ते 6000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

एकंदरीत गेल्या हंगामाची तुलना केली असता यंदाच्या हंगामात सोयाबीनला अपेक्षित असा बाजार भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मात्र देशातून सध्या सोया पेंड निर्यात वाढली असल्याने येत्या काही दिवसात दरवाढ होईल आणि निदान सोयाबीन पिकासाठी आलेला खर्च शेतकऱ्यांचा भरून निघेल अशी आशा आता व्यक्त होत आहे.

दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचे सोयाबीन बाजार भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सोयाबीन दर वाढले की घटले? 16 फेब्रुवारी 2023 रोजीचे महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव वाचा एका क्लिकवर

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe