Soybean Price Will Hike : सोयाबीन ही एक जागतिक कमोडिटी आहे. याचे बाजारभाव ठरताना वेगवेगळ्या बाबींचा प्रभाव पाहायला मिळत असतो. विशेषता जागतिक बाजारात होणाऱ्या घडामोडींचा सोयाबीन दरावर विशेष पगडा असतो. म्हणजेच जागतिक उत्पादन, मागणी, सोया तेलाचे दर, पामतेलासहित इतर खाद्यतेलाचे दर, सोयापेंडचे दर, नव्हे-नव्हे तर मक्याचे दर आणि कापूस सरकीच्या दराचा देखील याच्या बाजारभावावर परिणाम होत असतो.
खरं पाहता सोया पेंड हे पशुखाद्यासाठी सर्वाधिक वापरल जात. यामुळे जर सोयाबीनचे दर अधिक वाढले तर मक्याची आणि कापसाच्या सरकीची मागणी वाढते. मात्र जर कापूस सरकी आणि मका दर देखील तेजीत असले तर मात्र मग सोयापेंडला मागणी राहते.
याचा किती प्रभाव पडतो हे आकडेवारीत मोडता येणं अशक्य आहे मात्र याचा कुठे ना कुठे परिणाम हा होतच असतो. दरम्यान आता अशाच एका घटनेचा सोयाबीन दरावर परिणाम होणार आहे. खरं पाहता अर्जेंटिना हे प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्र आहे. या राष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दुष्काळजन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.
कमी झाला असल्याने त्या ठिकाणी सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. त्या ठिकाणी सोयाबीन उत्पादन घटणार असल्याचा दावा केला जात आहे. हा देश सोया पेंड निर्यातीसाठी संपूर्ण जगात ओळखला जातो. अशा परिस्थितीत मागणी आणि पुरवठा कुठे ना कुठे विस्कळीत होण्याचे चिन्हे असून त्यामुळे सोयाबीन दराला आधार मिळणार असल्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान आता अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्जेंटिनामध्ये खरंच सोयाबीन उत्पादन घटणार असल्याच्या दाव्याला दुजोरा दिला असल्याने सोयाबीन दरात थोडीशी वाढ पाहायला मिळत असून याचा परिणाम देशांतर्गत बाजारात देखील पुढील काळात जाणवेल असा देशातील तज्ञ लोकांनी अंदाज वर्तवला आहे. सद्यस्थितीत या अमेरिकेच्या अहवालामुळे जागतिक बाजारात सोयाबीन दर तेजीत आले आहेत.
मागील सहा महिन्यातील उच्चांकी दर काल सीबॉटवर नमूद करण्यात आले. विशेष म्हणजे केवळ सोयाबीनच नव्हे तर जागतिक बाजारात सोया पेंड देखील तेजीत आले आहे. मात्र असे असले तरी तूर्तास देशांतर्गत सोयाबीन बाजारात सोयाबीन दर स्थिर असून यामुळे कुठे ना कुठे शेतकरी बांधवांचा संयम तुटत चालला आहे.
शुक्रवारी झालेल्या लिलावाचा विचार केला असता देशांतर्गत बाजारात सोयाबीनला 5300 ते 5600 दरम्यान दर नमूद करण्यात आले आहेत तर राज्यातील परिस्थिती देखील अशीच काहीशी राहिली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे देशांतर्गत बाजाराला जागतिक बाजारात सोयाबीन दरात आलेली तेजी आधार देईल का? तर या प्रश्नावर बहुतेक तज्ञ लोक एकमुखाने आगामी काळात फायदा होईल मात्र किती दर वाढतील कसे वाढतील याबाबत कोणीही स्पष्टपणे बोलायला तयार नाही.
एकंदरीत सोयाबीन दर वाढतील मात्र खूपच मोठ्या प्रमाणात दरवाढीची आशा पाहायला मिळत नाहीये. यामुळे निश्चितच अर्जेंटिनामध्ये उद्भवलेली दुष्काळजन्य परिस्थिती आणि त्यामुळे घटलेले उत्पादन कुठे ना कुठे देशांतर्गत सोयाबीन उत्पादकांना दिलासा देईल असं चित्र निर्माण झालं आहे.