Soybean Price Will Increase : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अति महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता, राज्यात सोयाबीनची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. परंतु या हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीनमधून आतापर्यंत अपेक्षित असं उत्पन्न मिळालेलं नाही.
बाजारात सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहेत. बाजार अभ्यासकांच्या मते सध्या बँकिंग क्षेत्रात सुरू असलेल्या संकटामुळे शेतीमाल बाजारावर याचा विपरीत परिणाम होत आहे. सोयाबीन बाजारातही याच घटकामुळे सध्या मंदी पाहायला मिळत आहे. यामुळे देशातून निर्यात मंद झाली आहे. दरम्यान अर्जेंटिना मध्ये सोयाबीन उत्पादन कमी झाले यामुळे दरात वाढ होईल अशी आशा होती.
मात्र अर्जेंटिना मध्ये सोयाबीन उत्पादनात घट आणि ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादनात वाढ यामुळे या परिस्थितीचा फारसा फायदा झाला नाही. दरम्यान आता सोयाबीन उत्पादकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी अशी की ब्राझीलने आपल्या जैवइंधन धोरणात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार; जुनी पेन्शन योजनेसह या मागणीवरही शिंदे-फडणवीस सरकार सकारात्मक, पहा….
ब्राझीलमध्ये जैवइंधन म्हणून 70 टक्के सोयाबीन तेल वापरले जाते. दरम्यान आता जैवइंधनातं वाढ करण्याचा निर्णय ब्राझीलकडून घेतला गेला आहे. यामुळे आता सोयाबीन तेलाचा त्या ठिकाणी देशांतर्गत वापर आणखी वाढणार आहे. सद्यास्थितीला 70 टक्के सोयाबीन तेल जैव इंधनात वापरले जाते यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या ब्राझीलमध्ये 10% जैवइंधन मिश्रण केले जाते. मात्र आता 12% जैवइंधन मिश्रणाचे धोरण ब्राझीलकडून अवलंबिले जाणार आहे. विशेष म्हणजे 2026 पर्यंत हे प्रमाण 15% पर्यंत नेले जाणार आहे. वास्तविक 2023 पर्यंतच हे प्रमाण 15% ब्राझीलला करणे अपेक्षित होते.
त्यासाठी तेथील शासनाने निर्णय घेतला होता मात्र झालेली महागाई पाहता 2026 पर्यंत हे प्रमाण 15% केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या दहा टक्के इतकं जैवइंधन मिश्रणाचे प्रमाण तेथे आहे. या जैव इंधनापैकी 70% जैव इंधन म्हणून सोयाबीन तेल वापरले जाते. आता तेथे 12% इतके जैवइंधन मिश्रण केलं जाणार आहे.
हे पण वाचा :- पांढऱ्या टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग; 70 दिवसांत अर्ध्या एकरात झाली दीड लाखांची कमाई, कोणत्या जातीची केली लागवड?, पहा….
यामुळे ब्राझीलमध्ये आठ लाख सोयाबीन तेल अधिक वापर होणार आहे. याचा परिणाम म्हणून ब्राझील मधून सोयाबीन तेलाची निर्यात कमी होणार आहे. प्रमुख सोयाबीन तेल निर्यात देश म्हणून अर्जेंटिनाची ओळख आहे मात्र त्या ठिकाणी सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे.
यामुळे आता ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशातून सोयाबीन तेलाची निर्यात कमी होणार असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेलाचे भाव वाढेल आणि याचा परिणाम सरळ सोयाबीन दरावर होईल अशी शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवली जात आहे.
जाणकार लोकांच्या मध्ये सध्या देशांतर्गत सोयाबीनची आवक वाढली आहे. सोयाबीन सध्या पाच हजार ते पाच हजार तीनशे दरम्यान विक्री होत असून एप्रिलच्या मध्यापर्यंत अशीच परिस्थिती कायम राहील असा अंदाज आहे. यानंतर मात्र दर वाढीसाठी पोषक परिस्थिती राहील आणि दर सुधारू शकतात असं तज्ञ लोकांकडून सांगितलं गेलं आहे.
हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! खडकाळ माळरानावर फुलवली द्राक्षाची बाग; 11 एकरात मिळवला तब्बल 75 लाखाचा निव्वळ नफा, पहा…