Soybean Rate : संपूर्ण भारत वर्षात सोयाबीन या नगदी पिकाची शेती केली जाते. भारतातील एकूण सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर मध्य प्रदेश प्रथम क्रमांकावर विराजमान आहे तर महाराष्ट्र हे द्वितीय क्रमांकावर.
साहजिकच आपल्या राज्यात किती मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते हे आपल्या लक्षात आलेच असेल. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण देखील सोयाबीन या नगदी पिकावरच अवलंबून असल्याचे चित्र आहे.
सोयाबीन पिकातून शाश्वत उत्पादन मिळत असल्याने अलीकडे सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला विक्रमी दर मिळाला होता यामुळे उत्पादकांना पिकातून चांगले उत्पन्न मिळाले होते.
यामुळे यावर्षी देखील सोयाबीन पिकातून अधिक उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली शिवाय हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन दर दबावात असल्याने शेतकरी बांधवांना अपेक्षित अशी कमाई सोयाबीन पिकातून होत नसल्याचे चित्र आहे.
खरं पाहता या हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे ऑक्टोबर मध्ये सोयाबीनला नगण्य दर मिळत होता. नोव्हेंबर मध्ये मात्र परिस्थिती बदलली दरात थोडीशी वाढ झाली. अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी दर मिळाला.
मात्र डिसेंबर मध्ये पुन्हा एकदा सोयाबीन दारात घसरण झाली. सोयाबीन दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते साडेपाच हजार रुपये ते साडे पाच हजार प्रति क्विंटल वर येऊन ठेपले. संपूर्ण डिसेंबर महिना यादरम्यानच दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढली होती.
मात्र नववर्षाच्या सुरुवातीपासून सोयाबीन दरात हळूहळू वाढ होत असून सोयाबीन दराने साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. खरं पाहता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजित आले आहेत. याशिवाय प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्र म्हणजेच अर्जेंटिना या ठिकाणी सध्या सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत असून तिथे दुष्काळी परिस्थितीचा अनुभव येत आहे.
यामुळे त्या ठिकाणी उत्पादनात भली मोठी घट होणार आहे. आम्ही या ठिकाणी आपणास एक गोष्ट सांगू इच्छितो अर्जेंटिना हे सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत संपूर्ण जगात तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
अर्थातच त्या ठिकाणी सोयाबीन उत्पादनात घट होत असल्याने कुठे ना कुठे मागणी आणि पुरवठाचे समीकरण फिसकटणार आहे आणि याचा इनडायरेक्ट का होईना भारतीय शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
याशिवाय सोयाबीनचे दर त्याचे झाले आहेत तसेच सोयाबीन तेलाचे भाव देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. निश्चितच या जागतिक बाजारात होत असलेल्या घडामोडीचा देशांतर्गत बाजारात सकारात्मक असा परिणाम पाहायला मिळत असून सोयाबीन दराने साडेपाच हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
आता सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल असा दर बाजार समितीमध्ये मिळत आहे. दरम्यान जाणकार लोकांनी सोयाबीन दरात भविष्यात अजून वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.