Soybean Rate Maharashtra : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2023 च्या प्रारंभी थोडीशी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता नववर्षाच्या सुरुवातीला सोयाबीन दरात वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने सोयाबीन दरात वाढ नमूद केली जात आहे. यामुळे कुठे ना कुठे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
गेल्यावर्षीच्या शेवटी म्हणजे 2022 डिसेंबरमध्ये सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विकला जात होता. मात्र आता सोयाबीनने साडे पाच हजार रुपयांचा टप्पा पार केला असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

खरं पाहता 2021 मध्ये सोयाबीनला अतिशय विक्रमी दर मिळाला, यामुळे 2022 मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी सोयाबीनची पेरणी वाढली. मात्र सोयाबीन बाजारात आल्यानंतर होत्याचं नव्हतं झालं, सोयाबीनला अतिशय कवडीमोल असा दर मिळू लागला.
सुरुवातीला सोयाबीनमध्ये आद्रता अधिक असल्याचे कारण पुढे करत अनेक ठिकाणी चार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल वर सोयाबीनची खरेदी झाली. यानंतर थोडीशी दरात सुधारणा झाली. नोव्हेंबर महिन्यात काही ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर सोयाबीनला मिळू लागला होता.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मात्र डिसेंबर मध्ये पुन्हा एकदा सोयाबीन दरात घसरण झाली आणि सोयाबीन 5000 ते साडे पाच हजारावर आला. परंतु आता नववर्षाच्या सुरुवातीला सोयाबीन दराने साडेपाच हजार रुपयांचा टप्पा ओलांडला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
सोयाबीन दरवाढीची कारणे खालीलप्रमाणे
जाणकार लोकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी मोठी वधारली आहे. याशिवाय चायना मध्ये सोयाबीनची मागणी वाढणार असल्याची शक्यता आहे. तसेच जगातील तीन नंबरचा सोयाबीन उत्पादक देश अर्थातच अर्जेंटिनामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे त्या ठिकाणी सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम होत असून उत्पादनात मोठी घट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय भारतातून सोयापेंड निर्यात वाढू लागल्याने सोयाबीन दराला आधार मिळत असल्याचे चित्र आहे. याशिवाय खाद्यतेलाचे दरही कडाडले आहेत, साहजिकचं याचाही सोयाबीन बाजार भाव वाढीसाठी सकारात्मक असा परिणाम होत आहे.