Soybean Rate : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळत आहेत. ३ आणि ४ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या व्यवहारांनुसार सोयाबीनचे दर प्रती क्विंटल किमान ४६०० रुपयांपासून ते कमाल ६७५५ रुपयांपर्यंत नोंदवले गेले आहेत.
काही बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याने दरांवर दबाव दिसून येत आहे, तर काही ठिकाणी मर्यादित आवकेमुळे भावांना आधार मिळाल्याचे चित्र आहे.

विदर्भ विभागात सोयाबीनच्या दरांमध्ये तुलनेने चांगली उसळी दिसून येत आहे. ४ फेब्रुवारी रोजी नागपूर बाजार समितीत ९६९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे किमान दर ४६०० रुपये, कमाल दर ५७२६ रुपये, तर सर्वसाधारण दर ५४४४ रुपये राहिला.
अमरावती बाजार समितीत ३ फेब्रुवारी रोजी ४३०२ क्विंटल आवक झाली असून येथे सरासरी दर ५३०० रुपये नोंदवण्यात आला. कारंजा बाजारात तब्बल ६८०० क्विंटलची मोठी आवक असूनही सर्वसाधारण दर ५५२० रुपये इतका मजबूत राहिला आहे.
मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर आवक असूनही सोयाबीनचे दर फारसे घसरलेले नाहीत. जालना बाजार समितीत ४००९ क्विंटल आवक झाली असून येथे कमाल दर ६१०० रुपये आणि सर्वसाधारण दर ५५५० रुपये नोंदवण्यात आला.
माजलगाव बाजारात १३६५ क्विंटल आवकेसह ५५५० रुपये दर मिळाला, तर नांदेड बाजारात २३२ क्विंटल आवक असून सरासरी दर ५२५० रुपये राहिला.
उत्तर महाराष्ट्रात सोयाबीनचे दर मध्यम स्वरूपाचे राहिले आहेत. लासलगाव बाजार समितीत ७०५ क्विंटल आवक असून सर्वसाधारण दर ५६८० रुपये नोंदवण्यात आला.
लासलगाव-विंचूर येथे ९२५ क्विंटल आवकेसह ५६५० रुपये दर मिळाला. पिंपळगाव (ब) – पालखेड येथे हायब्रीड सोयाबीनला सरासरी ५७४० रुपये दर मिळाला, तर जळगाव बाजारात दर ५५०० रुपयांच्या आसपास राहिले.
राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने उच्चांक गाठला आहे. मंगरुळपीर बाजार समितीत २११७ क्विंटल आवक असून येथे कमाल दर ६७५५ रुपये नोंदवण्यात आला.
वाशीम येथे कमाल दर ६५०० रुपये, तर यवतमाळ येथे ५९०० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. औराद शहाजानी, देवणी आणि आंबेजोबाई या बाजारांतही ५६०० ते ५७०० रुपयांच्या दरम्यान भाव टिकून आहेत.
मात्र, काही बाजारांत चित्र वेगळे आहे. वरोरा बाजार समितीत किमान दर थेट २७१५ रुपये इतका घसरला आहे. तळोदा, गंगाखेड आणि लातूर-मुरुड या बाजारांत दर ४२०० ते ४९०० रुपयांच्या दरम्यान राहिले. कमी प्रत, ओलावा तसेच काही ठिकाणी जास्त आवक ही दर घसरणीमागील प्रमुख कारणे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.













