St Employee News : राज्यात सध्या शासन आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठे मतभेद पाहायला मिळत आहेत. वास्तविक शासन आणि प्रशासन ही दोन्ही एकाच गाडीचे चाक. यामुळे शासन आणि प्रशासनाला जनतेच्या हितासाठी कार्य करणं आवश्यक आहे. पण राज्य कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्याने राज्य कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
अशातच मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. वास्तविक पाहता गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नव्हतं. जसं की आपणास ठाऊकच आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. याची सहमती राज्य शासनाने न्यायालयात दिली आहे.

विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा 360 कोटी रुपये नियमित मिळत देखील होते. मात्र शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळावे यासाठी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लढा देखील उभारण्यात येत होता. अनेक कर्मचारी संघटनांनी याला पाठिंबाही दिला.
विरोधकांनी देखील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे अशी मागणी वारंवार सरकारकडे केली. अखेर सरकारने देखील यावर सकारात्मक निर्णय घेत एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नियमित निधी देण्याचे मान्य केले. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य शासनाकडून 100 कोटी रुपये आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती पोटी 100 कोटी रुपये अशा तऱ्हेने राज्य शासनाकडून 324.74 कोटी रुपये प्रतिमा हा एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय झाला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत सरकारकडून घोषणा करण्यात आली आणि लगेच तातडीने याचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला. दरम्यान आता मार्च महिन्यात दिल्या जाणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या वेतनापोटी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे मार्च महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांना वेळेतच पगार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच 7 मार्च रोजी एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात वेतन मिळेल हे जवळपास ठरलेलच आहे.