ST Employee News : देव पावला ! एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने दिला मोठा दिलासा ; संपकाळातील कर्मचाऱ्यांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ajay Patil
Published:
maharashtra news

ST Employee News : गेल्यावर्षी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप घडवून आणला होता. हा संप प्रचंड गाजला होता. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण केले जावे या आपल्या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षी जवळपास सहा महिने संप चालवला होता. हा संप मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडला होता.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो की, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी हा संप पुकारला होता. इथून हा संप जवळपास सहा महिने चालला आणि मार्च २०२२ मध्ये मग न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हा संप कर्मचाऱ्यांनी मागे घेतला. कर्मचाऱ्यांनी मग कामावर जाण्यासं तयारी दाखवली.

दरम्यान या सहा महिन्याच्या संपात एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमाराची वेळ आली होती. पगार मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या होत्या. हाती आलेल्या माहितीनुसार या सहा महिन्याच्या संप काळात एसटी महामंडळातील जवळपास 124 कर्मचाऱ्यांनी आर्थिक टंचाईमुळे आत्महत्या केली आहे.

दरम्यान आता संप काळात ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत किंवा मृत्यू झाला आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना आता त्यांच्या जागी नोकरी देऊ केली जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे निश्चितच संप काळात मयत झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

खरं पाहता एसटी कर्मचाऱ्यांचा संप सहा महिने चालला. यापैकी चार महिने तर संप अगदी काटेकोरपणे चालू होता. एकही कर्मचारी कामावर जात नव्हता. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठे नुकसान झाले. मात्र सहा महिने संप पुकारून देखील कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजेच महामंडळाचे शासनात विलिनीकरण होऊ शकले नाही.

मात्र सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांची वाढ केली होती. दरम्यान आता गेल्या वर्षी सहा महिने जो संप पुकारला होता त्यामध्ये मयत झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याची घोषणा शासनाने केली आहे. यामुळे निश्चितच त्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe