St Employee News : एसटी महामंडळातील संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता महामंडळातील कर्मचारी सरकारने आपल्या प्रलंबित मागण्या सोडवल्या पाहिजेत या अनुषंगाने वारंवार निवेदने देत असतात, आंदोलने करत असतात वेळप्रसंगी संपदेखील पुकारतात.
2018 मध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांनी एक संप पुकारला होता. मात्र या संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या नियमानुसार वेतन कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. जे कर्मचारी संपात सामील असतील त्यांचे एका दिवसाच्या बदलात आठ दिवसाचे पेमेंट कापले जाईल असा निर्णय घेण्यात आला होता.
खरं पाहता, महामंडळाच्या नियमातच बेकायदा संप पुकारला तर एका दिवसाच्या वेतनाच्या मोबदल्यात आठ दिवसांचे वेतन कापले जाईल अशी तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर दोषी कर्मचाऱ्यांचे पेमेंट कट करण्यात आले होते. मात्र, या निर्णयाचा कडाडून विरोध एसटी कर्मचाऱ्यांकडून होत होता. शेवटी मग हे प्रकरण औद्योगिक न्यायालयात गेलं.
यामध्ये कर्मचाऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र औद्योगिक न्यायालयाने एका दिवसाच्या बदलात दोन दिवसाचे वेतन कापले जावे असे निर्देश नव्याने जारी केले होते. हे आदेश दिवाळी सणाच्या दरम्यान जारी झालेत. मात्र सणासुदीच्या काळात महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसला असता.
अशा परिस्थितीत महामंडळाने त्यावेळी या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती. अशा परिस्थितीत औद्योगिक न्यायालयाच्या या निर्णयाची अंमलबजावणी हेतू या डिसेंबर महिन्याच्या म्हणजे जानेवारीत एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या पेमेंट मधून एका दिवसाच्या बदल्यात दोन दिवसाचे पेमेंट कपात करण्यात आल आहे.
2018 मध्ये एकूण दोन दिवसाचा संप झाला होता यामुळे आता दुसऱ्या दिवसाची पेमेंट कपात फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. दरम्यान औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयापूर्वी दोषी एसटी कर्मचाऱ्यांचे एका दिवसाच्या बदलात आठ दिवस या पद्धतीने एकूण सोळा दिवसाचे जे वेतन कपात झाले आहे त्याची भरपाई देखील महामंडळाकडून केली जाणार आहे.