25 हजार रुपयात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याकाठी होणार 50 हजारापर्यंतची कमाई, वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
Small Business Idea

Small Business Idea : अलीकडे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशा रुटीन जॉब ऐवजी छोटासा का होईना पण स्वतःचा व्यवसाय करायचा असे स्वप्न नवयुवक तरुण पाहत आहेत.

दरम्यान जर तुमचाही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण लो इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू होणाऱ्या एका भन्नाट बिजनेस आयडिया बाबत डिस्कस करणार आहोत.

आज आपण अवघ्या 25 हजारात सुरू होणाऱ्या एका व्यवसायाची माहिती पाहणार आहोत. यामुळे जर तुमच्याकडे कमी भांडवल असेल मात्र तरीही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे.

कोणता आहे तो व्यवसाय ?

अलीकडे भारतात ऑटोमोबाईल सेक्टर खूपच ग्रो करत आहे. आपल्यापैकी अनेकांकडे टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर तसेच मालवाहतूक गाड्या असतील.

यामुळे ऑटोमोबाईल सेक्टरशी निगडीत व्यवसाय केला तर यातून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कार वॉशिंग सेंटर सुरू करू शकता.

हा व्यवसाय तुम्हाला एक रोडसाइड व्यवसाय वाटत असेल मात्र यातून होणारी कमाई ही खूपच अधिक आहे. या व्यवसायातून महिन्याकाठी 50 हजार रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते.

किती गुंतवणूक करावी लागेल

कार वॉशिंग बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला एक प्रोफेशनल मशीन लागणार आहे. या मशीनची किंमत बारा हजारापासून ते एक लाख रुपयांपर्यंत असते. सुरुवातीला मात्र तुम्ही कमी किमतीचे मशीन खरेदी केले पाहिजे. सुरुवातीच्या टप्प्यात 14 हजार रुपयांचे मशीन खरेदी करून हा व्यवसाय सुरू करू शकता.

14 हजार रुपयात दोन हॉर्स पॉवरची मशीन मिळते. यामध्ये तुम्हाला पाईप आणि नोजल देखील मिळणार आहे.

याशिवाय तुम्हाला कार वॉशिंग करण्यासाठी सिमेंट काँक्रेटचे एक स्टॅन्ड तयार करावे लागणार आहे. एकंदरीत हा व्यवसाय पंचवीस हजार रुपये ते 50 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो.

किती कमाई होणार ?

कार वॉशिंग करण्यासाठी 150 रुपयांपासून ते 450 रुपयांपर्यंतचे चार्ज आकारले जातात. जर समजा तुम्ही दिवसाला 250 रुपयाप्रमाणे सात ते आठ कार वॉश केल्यात तर दोन हजार रुपये प्रति दिवस एवढी कमाई या व्यवसायातून होणार आहे.

यातून तुम्हाला खर्च वजा करता 1000 ते 1500 रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते. जर व्यवसाय चांगला चालायला लागला तर ही कमाई दोन हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच या व्यवसायातून तुम्हाला 45 ते 50 हजारापर्यंतची कमाई सहजतेने होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe