SBI Atm Franchise:- कुठलाही व्यवसाय सुरू करायचा राहिला म्हणजे आपल्याला त्यासाठी अगोदर गुंतवणूक म्हणून पैसा टाकावा लागतो. परंतु व्यवसायामध्ये आपल्याला जोखीम असल्याचे दिसून येते व बऱ्याचदा व्यवसाय तोट्यात जाण्याची देखील शक्यता असते. जर असे झाले तर मात्र खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका आपल्याला बसू शकतो.
त्यामुळे प्रत्येकजण ज्याला कोणाला व्यवसाय सुरू करायचा असेल ते व्यवसायामध्ये कमीत कमी जोखीम आहे आणि प्रत्येक महिन्याला आपल्याला चांगला पैसा मिळू शकेल अशा व्यवसायाच्या शोधात असतात.
त्यामुळे तुम्हाला देखील व्यवसाय सुरू करायचा आहे व तुम्हीही अशाच प्रकारच्या कमी जोखमीचा आणि चांगला नफा मिळवता येईल अशा व्यवसायाच्या शोधात असाल तर आपण या लेखांमध्ये एक छान असा व्यवसाय बघणार आहोत. जो तुम्ही तुमच्या गावात किंवा शहरात राहून अगदी आरामात सुरू करू शकतात.
एसबीआय एटीएम फ्रॅंचाईजी घ्या आणि चांगला पैसा मिळवा
एसबीआय एटीएम फ्रेंचाईजी व्यवसाय हा एक उत्तम असा व्यवसाय असून यामध्ये कमी जोखीम आणि चांगले उत्पन्न मिळण्याची शाश्वती असते. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम रस्त्याच्या बाजूला किंवा बाजारपेठेत किंवा गावामध्ये आपण बघतो.
परंतु अशा प्रकारची एटीएम बँकच बसवते असे नसते. अशा प्रकारचे एटीएम बसवण्याची आणि ते चालवण्याची जबाबदारी बँकेने अधिकृत कंपन्यांना दिलेली असते.
यामध्ये मुथूट एटीएम, टाटा इंडिकॅश आणि इंडिया वन एटीएम यासारख्या ज्या कंपन्या आहेत त्या फ्रेंचायसी मॉडेलवर यामध्ये काम करतात. जर तुम्ही या कंपन्यांशी जोडले गेलात आणि एसबीआय एटीएम सुरू केले तर तुमच्यासाठी एक कायम उत्पन्नाचा स्त्रोत बनवू शकतात.
5 लाखांची गुंतवणूक देईल महिन्याला 50 ते 60 हजार रुपयापर्यंत कमाई
एसबीआय एटीएम फ्रॅंचाईजी जर तुम्हाला सुरू करायची असेल तर सुरुवातीला तुम्हाला पाच लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. ही गुंतवणूक प्रामुख्याने एटीएम मशीन, त्या मशीनची स्थापना तसेच सुरक्षा आणि देखभाल इत्यादीवर खर्च केली जाते.
या व्यवसायामध्ये मिळणारी कमाई जर बघितली तर ती कमिशनच्या स्वरूपात जास्त प्रमाणात मिळते. जेव्हा एखादा ग्राहक तुमच्या एटीएम मधून पैसे काढतो तेव्हा तुम्हाला प्रति व्यवहार आठ ते पंधरा रुपयापर्यंत कमिशन मिळते.
इतकेच नाही तर काही प्रकरणांमध्ये बँक तुमच्या एटीएम जागेचे भाडे देखील तुम्हाला देते. समजा एखाद्या गर्दीच्या किंवा बाजारपेठेच्या ठिकाणी तुमची एटीएम असेल व दररोज त्यामधून 200 ते 300 व्यवहार सहज होत असतील तर त्यानुसार तुम्ही दरमहा महिन्याला 60 ते 70 हजार रुपयांची कमाई करू शकतात.
एसबीआय एटीएम फ्रेंचायसी व्यवसायाकरिता आवश्यक गोष्टी
1- योग्य जागा निवडणे- याकरिता योग्य जागा निवडणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे साधारणपणे 50 ते 80 स्क्वेअर फुट जागा असावी व ती जागा मार्केट, बस स्टॅन्ड तसेच रेल्वे स्टेशन किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी असावी. तसेच त्या जागेच्या 100 मीटरच्या आत दुसरे कोणतेही एटीएम नसावे. जेणेकरून तुमच्या एटीएम वर जास्त प्रमाणात ग्राहक येऊ शकतील.
2- विज आणि इंटरनेट सुविधा- एटीएम मध्ये सुरळीत कामकाज चालावे याकरिता 24 तास विजेची उपलब्धता आणि एक किलो वॅटचा पावर बॅकअप अनिवार्य असतो. तसेच उत्तम आणि जलद चालू शकेल असे इंटरनेट कनेक्शन देखील आवश्यक आहे.
जेणेकरून व्यवहार प्रक्रिया कोणत्याही त्रासाशिवाय पूर्ण होऊ शकेल. ग्राहकांच्या चांगल्या सेवेसाठी व समाधानासाठी या सुविधा महत्त्वाच्या आहेत.
3- सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना- तुम्ही एटीएमच्या गाळ्यात किंवा ज्या जागेत ठेवत असाल त्या एटीएम ठेवण्याच्या जागी वरती पक्का स्लॅब असणे गरजेचे आहे तसेच विटा आणि काँक्रीटचा गाळा असला तर फायद्याचा ठरेल.
तसेच सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षकांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे सुरक्षेचे उपाय ग्राहकांना आत्मविश्वास देतात आणि तुमचे फ्रॅंचाईजीचे काम चांगल्या पद्धतीची आहे हे या माध्यमातून निश्चित होते.
4- आवश्यक परवानगी आणि कागदपत्रे- समजा तुम्ही यासाठी जर भाड्याने जागा घेत असाल तर संबंधित जागेच्या मालकाकडून एनओसी घेणे गरजेचे आहे. तसेच आधार व पॅन कार्ड, व्यवसायाची नोंदणी आणि बँक स्टेटमेंट यासारखे कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. जर योग्य कागदपत्रे आणि परवानगी तुमच्याकडे असतील तर तुमचा फ्रेंचाईजी साठी केलेला अर्ज स्वीकारण्याची शक्यता वाढते.
कुठे अर्ज करावा लागेल?
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला यामध्ये सांगितलेल्या अधिकृत कंपन्यांच्या संकेतस्थळावर जावे लागेल व यासाठीची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. अर्ज करताना फक्त प्रमाणित वेबसाईटचा वापर करावा.
या कंपन्यांमध्ये टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम यांचा समावेश होतो. या कंपन्यांच्या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागतो व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात.