State Employee HRA : राज्य शासनाने जुलै 2021 पासून राज्यातील शासकीय कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या घरभाडे भत्त्यात वाढ केली. त्यावेळी घरभाडे भत्त्यात तीन टक्क्याची वाढ करण्यात आली. म्हणजेच शासकीय कर्मचाऱ्यांना 27% घरभाड भत्ता त्यावेळी देण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी मात्र ऑक्टोबर 2021 पासून झाली.
म्हणजेच जुलै 2021 पासून ते सप्टेंबर 2021 पर्यंत घर भाडे भत्त्याची फरकाची रक्कम म्हणजेच एचआरए एरियर्स राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देणे अपेक्षित होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता वाढीचा लाभ ऑक्टोबर महिन्यापासून मिळाला तसेच घर भाडे भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना मिळाली.
मात्र अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या घरभाडे भत्ता फरकाच्या रकमेपासून वंचित रहावे लागले. शालार्थ वेतन प्रणाली मध्ये फरक काढण्याचा टॅब उपलब्ध नसल्याचे कारण देत या कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता फरकाच्या रकमेपासून वंचित ठेवण्यात आले. याबाबत शिक्षकांच्या तक्रारीनंतर मुंबई मराठा अध्यापक संघांचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना ही चूक लक्षात आणून दिली.
वास्तविक, ही घरभाडे भत्ता फरकाची रक्कम शिक्षकांना तातडीने द्यावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग वापरू असा इशारा शिक्षकांकडून दिला जात होता. याच पार्श्वभूमीवर आता शिक्षण विभागाच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी वाढवण्यात आलेला घरभाडे भत्ता फरकाची रक्कम संबंधित शिक्षकांना वर्ग करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
आता लवकरच ही फरकाची रक्कम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मुंबई व कोकण विभागातील सुमारे 40,000 शिक्षकांच्या खात्यात घर भाडे भत्ता फरकाची रक्कम जमा होणार आहे. याबाबत मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरणारे यांनी माहिती दिली आहे.
एकंदरीत दोन वर्षांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या फरकाच्या रकमेची मागणी करत होते अखेरकार ही मागणी मान्य झाली असून आता या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही रक्कम लवकरच मिळेल असा आशावाद यानिमित्ताने व्यक्त होत आहे.