अक्षय तृतीयाच्या आधी राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार गोड बातमी ! महाराष्ट्र राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ‘इतका’ वाढणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला, आता आम्हाला केव्हा महागाई भत्ता वाढ मिळणार असा प्रश्न राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होतोय. दरम्यान याच संदर्भात आता एक नव अपडेट हाती आल आहे.

Published on -

State Employee News : गेल्या महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळाली. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के इतका करण्यात आला.

28 मार्च 2025 रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी झाला असून जानेवारी 2025 पासून ही महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम मिळणार आहे.

खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. मार्च महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्ता वाढीचा निर्णय होत असतो आणि ही वाढ अनुक्रमे जानेवारी आणि जुलै महिन्यापासून लागू केली जात असते.

दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता सुधारित केला जातो.

आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका झाला असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील सुधारित होणे आवश्यक आहे. आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे.

अक्षय तृतीयाच्या आधी मिळणार मोठी भेट

महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना सध्या 53 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय. मात्र लवकरच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% करण्याबाबतचा निर्णय एप्रिल अखेरीस होण्याची शक्यता आहे.

हा निर्णय एप्रिल अखेर झाला तरी देखील ही वाढ जानेवारी महिन्यापासूनच लागू राहणार आहे. म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तथापि याबाबतची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही.

राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका कधी वाढणार, किती वाढणार या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर शासन निर्णयाच्या माध्यमातून जारी होणार आहे.

मात्र आत्तापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की एक ते दोन महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांचा देखील महागाई भत्ता वाढत असतो. यामुळे एप्रिलच्या शेवटी याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे झाल्यास अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मात्र वाढणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News