State Employee News : महाराष्ट्र राज्य शासनात कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. खरं पाहता गेल्या अनेक वर्षांपासून राज्य कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना, बक्षीस समितीच्या शिफारशी मान्य करणे यांसारख्या वेगवेगळ्या मागण्या मान्य केल्या जाव्यात म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.
दरम्यान आता राज्य कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा लवकरच सक्सेसफुल होणार असल्याचे चित्र आहे. खरं पाहता बक्षी समितीच्या शिफारशीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे विचाराधीन असून याबाबत लवकरच सकारात्मक असा विचार केला जाईल असे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे.
निश्चितच बक्षी समितीच्या शिफारशी लागू झाल्या तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीवर जवळपास 240 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. या निर्णयामुळे सहाव्या वेतन आयोग अंतर्गत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात असलेली तफावत दूर केली जाणार असून सातव्या वेतन आयोग अंतर्गत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे.
याशिवाय 5400 पेक्षा अधिक ग्रेड पे असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांबाबत देखील एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. खरं पाहता अशा कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर तीन आश्वासित प्रगतीचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच या कर्मचाऱ्यांना देखील अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान या मागणीवर देखील लवकरच शिक्कामोर्तब होणार असल्याचा दावा सदर मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
निश्चितच बक्षी समितीचा अहवाल राज्य शासनाने मान्य केला तर राज्यातील ज्या संवर्गामध्ये वेतन तफावत आहेत त्यापैकी बहुतांशी संवर्गातील वेतन तफावत दूर होणार आहे. बक्षी समितीच्या अहवालात असं नमूद करण्यात आला आहे की राज्यातील एकूण 200 संवर्गात कर्मचाऱ्यांच्या वेतनातं तफावत आहे.
यापैकी एकूण 122 संवर्गात वेतन तफावत दूर करण्याचा प्रस्ताव बक्षी समितीचा आहे. निश्चितच समितीचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर राज्य शासनाच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे मात्र यामुळे कुठे ना कुठे राज्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.