State Employee News : ब्रेकिंग ! राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन स्थगित; ‘हा’ झाला निर्णय, आज पासून कामसुरू

Published on -

State Employee News : राज्यातील अकृषी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी कामबंद आंदोलनाच हत्यार उपसलं होत. या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मात्र विद्यार्थी आणि शिक्षकांची मोठी हेळसांड होत होती.

या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 20 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन छेडलं. तत्पूर्वी या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लांछणिक स्वरूपाचे आंदोलने केली होती. मात्र शासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी 20 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली.

मात्र, या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. खरं पाहता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बारावी बोर्डाच्या परीक्षा प्रभावित होत होत्या. याचा सर्वाधिक फटका शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बसत होता. शिक्षकेतर कर्मचारी काम बंद आंदोलनावर असल्याने शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामे करावी लागत होती.

यामुळे या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हे आंदोलन तात्पुरत स्थगित केलं. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आता आपल्या प्रलंबित मागण्या राज्य शासनाला शासन निर्णयाच्या माध्यमातून निकाली काढण्यासाठी 10 मार्च पर्यंत मुदत दिली आहे. जर प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन निर्णय 10 मार्चपर्यंत जारी झाला नाही तर 11 मार्चपासून पुन्हा एकदा काम बंद आंदोलन करू असा इशारा यावेळी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की शिक्षकेतर कर्मचारी, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरात लवकर भरली जावी यांसारख्या अन्य काही प्रमुख मागणीसाठी आक्रमक झाले असून काम बंद आंदोलन त्यांनी केलं होतं.

मात्र विद्यार्थी आणि शिक्षकांची परवड लक्षात घेता या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपलं काम बंद आंदोलन तात्पुर्त स्थगित केल आहे पण हे आंदोलन 11 मार्चपासून पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. यामुळे आता राज्य शासनाच्या माध्यमातून या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संदर्भात काय निर्णय घेतला जातो, यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News