राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘असं’ बेशिस्त वर्तणूक केल्यास बसणार मोठा भुर्दंड, परिपत्रक जारी, वाचा

Ajay Patil
Published:
State Employee News

State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता रस्ते वाहतुकीत होणारे अपघात ही एक चिंतेची बाब आहे. रस्त्यावरील अपघातांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकदा वाहनचालकाच्या बेशिस्त वागण्यामुळे अपघात होतात. रस्ते अपघातात प्रामुख्याने दुचाकी स्वार वाहनचालकाला अधिक हानी होते. दुचाकीस्वार अनेकदा अपघातात आपला जीव देखील गमावतात.

हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अनेकदा दुचाकीस्वार नागरिकांचा मृत्यू होतो. यामुळे हेल्मेट सक्तीसाठी जनजागृती देखील केली जात आहे. मात्र तरीही नागरिकांकडून हेल्मेट वापरले जात नाही. यामुळे आरटीओच्या माध्यमातून अशा बेसिस्त दुचाकी स्वार वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान आता हेल्मेट न वापरता कार्यालयात जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता डीएपी मात्र 600 रुपयात मिळणार, केंद्र सरकारने लॉन्च केले नवीन डीएपी, पहा…

या पार्श्वभूमीवर आता परिवहन विभागाने महत्त्वाच परिपत्रक निर्गमित केले आहे. सदर परिपत्रकानुसार आता सरकारी कर्मचार्‍यांनी कार्यालयात जाताना हेल्मेट घातले नाही तर संबंधित कार्यालयातील विभागप्रमुखांवर कारवाई म्हणून दंड आकारला जाणार आहे. राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी राज्यातल्या 50 आरटीओ कार्यालयांना हेल्मेट वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचना पाठवल्या असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

या मार्गदर्शक सूचनेनुसार, आता राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांनी मोटार वाहन नियम 154 सी ची काटेकोर अमंलबजावणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अर्थातच आता या नियमांची आरटीओ कार्यालयांकडून कसून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीवरून सरकारी कार्यालयात जाणाऱ्यासरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

हे पण वाचा :- मुंबईमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विभागात निघाली विविध पदासाठी भरती, 65 हजारापर्यंतचा पगार मिळणार, वाचा सविस्तर

सरकारी कार्यालयानंतर खाजगी कार्यालयांसाठी देखील हा नियम लागू होऊ शकतो असे देखील परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परिवहन विभागाच्या मते अशा पद्धतीने कारवाई केल्यास हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. परिणामी, रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गाडी चालवताना सुरक्षा साधने न वापरणार्‍या नागरिकांना 1000 रुपये दंड आणि चालक परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचे नियम आहेत.

यामुळे आता जे सरकारी कर्मचारी कार्यालयात जाताना हेल्मेट वापरणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांकडून एक हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो तसेच अशा बेशिस्त सरकारी कर्मचाऱ्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यापर्यंत निलंबित देखील होऊ शकत. निश्चितच परिवहन विभागाने घेतलेला हा निर्णय रस्ते अपघातात होणारे मृत्यू कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतो.

हे पण वाचा :- पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ विद्यापीठात निघाली विविध पदांसाठी भरती, वाचा याविषयी सविस्तर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe