State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबतच्या विषयाशी निगडित आहे. खरंतर सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे.
इतकेच काय तर देशातील 25 हुन अधिक राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय तेथील राज्य सरकारकडून 60 वर्षे एवढे करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्यातील काही राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 60 वर्ष आहे.

राज्य शासकीय सेवेतील ड संवर्गात कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 60 वर्षे एवढे करण्यात आले आहे. मात्र राज्यातील अ, ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे इतकेच आहे. यामुळे या संबंधित राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे इतके व्हावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उपस्थित केली जात आहे.
दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे यांच्याशी कर्मचारी संघटनानी केलेल्या चर्चेमध्ये निवडणुकीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते.
पण नवीन सरकार स्थापित होऊन बऱ्याच दिवसांचा काळ उलटला आहे पण अजूनही या संदर्भातील कोणता सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे आता राज्य शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा एकदा 70 वर्षांपर्यंत सेवेत रुजू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता कर्मचारी संघटनांकडून सरकारला इशारा देण्यात आला आहे
तर आंदोलन करू
महाराष्ट्रातील राजपत्रित अधिकारी महासंघाने फडणवीस सरकारला इशारा दिला आहे. या कर्मचारी संघटनेने राज्य सरकारकडे निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली आहे. सध्या राज्यातील अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय 58 वर्षे असून, ही वयोमर्यादा वाढवावी, राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा महासंघाने दिला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की संघटनेकडून राज्य सेवेत नियुक्तीची वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी 38 तर मागासवर्गीयांसाठी 43 वर्षे आहे. अशा स्थितीत निवृत्ती वय 58 असणे हे अव्यवहार्य असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे. यामुळे आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा एकदा सेवेत रुजू करणार
खरेतर, सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सरकारने अलीकडेच घेतलेला एक मोठा निर्णय. 10 जून 2025 रोजी शासनाकडून एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, या सदर शासन निर्णयाद्वारे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीने पुन्हा सेवेत घेता येणार आहे.
मात्र सरकारच्या या निर्णयाला महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. राज्यात 7.19 लाख मंजूर पदांपैकी सुमारे 2.75 लाख पदे रिक्त असून, दरवर्षी 3 टक्के जागा सेवानिवृत्तीमुळे रिक्त होतात. अशा परिस्थितीत, करार पद्धतीने भरती न करता नियमित भरती करावी, अशी मागणी राजपत्रित महासंघाकडून यावेळी उपस्थित करण्यात आली आहे.













