State Employee News : शिंदे फडणवीस सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला होता. राज्य शासनाने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र निर्णय झाला असला तरी देखील या अंगणवाडी सेविकांना आणि मदतनिसांना आपल्या मानधनासाठी अजूनही झगडावेच लागत आहे.
कारण की, या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यातील वेतन अद्याप मिळालेले नाही. आज 27 एप्रिल उजाडली मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन मिळालं नसल्याने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाविरोधात आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. वेळेवर वेतन मिळत नसल्याने अंगणवाडी सेविकांमध्ये शिंदे फडणवीस सरकार विरोधात नाराजी आहे.

हे पण वाचा :- खुशखबर! भारतीय नौदलात ‘या’ पदासाठी भरती; पात्रता फक्त 10वी पास अन पगार मिळणार तब्बल 63 हजार, वाचा सविस्तर
अंगणवाडी कर्मचारी संघाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित वितरित करण्याची मागणी केली असून कर्मचाऱ्यांना त्वरित वेतन मिळाले नाही तर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना वेळेवर वाढीव वेतन मिळाले नाही तर पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यामुळे आता अंगणवाडी सेविकांचे वेतन नेमकं केव्हा होतं? याबाबत शिंदे फडणवीस सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. दरम्यान आता आपण अंगणवाडी सेविकांना किती मानधन वाढ शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केली आहे याबाबत जाणून घेऊया.
हे पण वाचा :- एमपीएससी ग्रुप बी – ग्रुप सी संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर ! ‘या’ दिवशी होणार परीक्षा, पहा परीक्षा केंद्रांची यादी
किती मिळणार मानधन?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 रुपये प्रतिमाह इतके होते. मात्र या महागाईच्या काळात एवढ्या तुटपुंजी मानधनमध्ये कर्मचाऱ्यांच घर कसं चालणार? हा मोठा प्रश्न अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. यामुळे मानधन वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनाची दखल घेत शिंदे-फडणवीस सरकारने १६७५ रुपये एवढी मानधनात वाढ केली असून 10000 रुपये मानधन अंगणवाडी सेविकांना जाहीर केले आहे.
तसेच अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 4425 होते यामध्ये १०७५ रुपयांची वाढ झाली असून आता या अंगणवाडी मदतनीसांना 5500 रुपये मानधन देण्याचे जाहीर केले आहे. मात्र मार्च महिन्याचे वेतन या कर्मचाऱ्यांना अद्याप मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे आता या कर्मचाऱ्यांचे वेतन नेमका केव्हा होते याकडे लक्ष लागून आहे.
हे पण वाचा :- अरे वा ! ‘हा’ घसरलेला स्टॉक गुंतवणूकदारांना कमी दिवसात बनवणार मालामाल; मिळणार तब्बल ‘इतके’ रिटर्न्स, कोणता आहे ‘तो’ स्टॉक