State Employee News : राज्यात सध्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी शासनाकडे मागणी पत्र सादर केली जात आहेत. तर काही कर्मचारी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करत आहेत.
राज्यातील अंगणवाडी सेविकांनी देखील गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील जवळपास 16 जिल्ह्यातून अधिक जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनीस यांनी बेमुदत काम बंद सुरू केले आहे. मानधन वाढीसह इतर काही प्रलंबित मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी संपाच हत्यार उपसल आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
राज्य शासन आणि अंगणवाडी सेविकांमध्ये सकारात्मक अशी चर्चा झाली आहे. राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका दाखवली आहे. राज्य शासन आणि अंगणवाडी सेविका यांच्यामध्ये नुकतीच मानधन वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक संपन्न झाली. या बैठकीत सकारात्मक अशी चर्चा झाली असून अंगणवाडी सेविकांची मानधन वाढ शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार अंगणवाडी सेविकांना दीड हजाराची मानधन वाढ देण्यात आली आहे.
एवढेच नाही तर अंगणवाडी सेविकांना सेवा समाप्तीनंतर पेन्शन साठी देखील लवकरच पेन्शन योजना सुरू केली जाणार असल्याची माहीती देखील समोर येत आहे. मात्र ही पेन्शन योजना अंगणवाडी सेविका आणि राज्य सरकार यांच्या समभागातून सुरू होणार आहे. सोबतच अंगणवाडी सेविकांना मोबाईलही दिले जाणार आहेत. एकंदरीत अंगणवाडी सेविकांचा संप त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून त्यांनी उभारलेला लढा यशस्वी झाला आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्या सोडवण्यासाठी, आपल्या हक्कासाठी या पद्धतीने संपाचा मार्ग पत्करावा लागतो.
दरम्यान आता मार्च महिन्यात सर्व राज्य कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामुळे या काम बंद आंदोलनाचा काय परिणाम होतो, राज्य कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनेची मागणी मान्य होते का, शासन यावर नेमका काय तोडगा काढतो? याकडे देखील आता कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.