State Employee News : येत्या काही दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाचं काही राज्य कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. खरं पाहता, या नवीन वर्षाच्या प्रारंभी राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगाराच्या बाबतीत एक मोठ अपडेट समोर आलं आहे.
ती अपडेट म्हणजे जानेवारी महिन्यात राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार असल्याचे काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे डिसेंबर महिन्यातील पगार जे की जानेवारी महिन्यात होतील ते रखडणार आहेत.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार शालार्थ वेतन प्रणालीच्या माध्यमातून केले जातात. मात्र मागील तीन दिवसांपासून ही प्रणाली बंद आहे. आता प्रणाली बंद म्हटल्यावर या कर्मचाऱ्यांचे वेतन बिल जनरेट होत नाहीयेत.
खरं पाहता 19 डिसेंबर पासून ही वेतन प्रणाली बंद असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले. ही प्रणाली पूर्णपणे बंद असल्याने वेतन बिले तयार करून घेणे, ती कोषागारात सादर करणे, मंजूर करून बँक खात्यात जमा करणे यात बराच वेळ जात आहे.
यामुळे डिसेंबर महिन्यातील पेमेंट हे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेत मिळेल का? याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. निश्चितच नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा एक मोठा फटका आहे.
दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार याबाबत शिक्षक परिषदेने शालेय शिक्षण विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवडे आहे. यामुळे राज्यातील या कर्मचाऱ्यांचे विभागाकडून काय निर्णय घेतला जातो आपला पगार वेळेवर होतो का या सर्व बाबींकडे लक्ष लागून आहे.