ब्रेकिंग! राज्य कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक; संपात सामील झालेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश निर्गमित

Ajay Patil
Published:
State Employee Strike

State Employee Strike : सध्या राज्यभर जुनी पेन्शन योजनेवरून कर्मचारी आणि सरकार आमने-सामने आले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करताना भविष्याच्या परिणामांचा विचार करावा लागेल म्हणून जुनी पेन्शन तडकाफडकी लागू होणार नाही, असा पवित्रा राज्य शासनाने घेतला आहे. तर कर्मचारी मात्र तोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील असे सांगत आहेत. 14 मार्चपासून सुरू झालेला संपाचा आज पाचवा दिवस.

आज देखील राज्यातील जवळपास 18 लाख कर्मचारी संपावर आहेत. अशातच राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी ठाणे जिल्ह्यातील संपात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास अडथळा आणणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत.

हे पण वाचा :-सातारा, सांगली, कोल्हापूरहुन मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता ‘हे’ दोन दिवस बंद राहणार ‘हा’ मार्ग

सोबतच संपाचा जिल्ह्यातील शासकीय कामकाजांवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना संबधितांना दिल्या आहेत. यासोबतच पालकमंत्री देसाई यांनी शासकीय कर्मचाऱ्याच्या संप कालावधीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालय येथे बाह्ययंत्रणेव्दारे कर्मचारी नेमून रुग्णसेवा सुरू ठेवावी अशा सूचना केल्या आहेत. रुग्णालयात रुग्णांच्या तपासणीवर परिणाम होणार नाही याची काळजी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना घेण्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

हे पण वाचा :- महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के तिकीट सवलत लागू; पण ‘या’ महिलांना मिळणार नाही याचा लाभ, वाचा याविषयी सविस्तर

एकंदरीत संपात सामील न झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यास ज्या कर्मचाऱ्यांकडून अडथळा आणला जात असेल अशा कर्मचाऱ्यांवर संबंधित विभागप्रमुखांकडून कारवाई केली जावी असे आदेश यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री देसाई यांनी दिले आहेत. याशिवाय राज्य शासनाच्या माध्यमातून संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संपातून माघार घेण्याचे आवाहन केले जात आहे.

मात्र संपकरी कर्मचाऱ्यांकडून जोपर्यंत ओपीएस योजना लागू होत नाही तोपर्यंत हा संप अविरतपणे सुरू राहील असं सांगितलं जात आहे. कर्मचारी आणि शासन यामधील जुनी पेन्शन योजनेसंदर्भात असलेला हा तिढा केव्हा सुटतो? संपावर शासनाकडून तोडगा काढला जाईल का? यांसारखे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! पालखी मार्गात होणार बदल? या एका कारणामुळे रूटमध्ये बदल होणार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe