‘हा’ स्टॉक ठरला शेअर मार्केटचा बादशाह ! ‘इतक्या’ वर्षातच गुंतवणूकदाराचे 60 हजाराचे बनवलेत 10 कोटी, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आली फळाला

Ajay Patil
Published:

Stock Market : शेअर मार्केट म्हटलं की लाखोचे करोडो होतात आणि करोडोचे लाखो देखील बनतात. आपणही शेअर मार्केट मधील होणाऱ्या नफ्याचे आणि तोट्याचे अनेक उदाहरणे पाहिले असतील. शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

विशेषता लॉंग टर्म मध्ये अनेक गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. शेअर बाजारातील जाणकार लोक देखील गुंतवणूकदारांना नेहमीच लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सल्ला देत असतात.

दरम्यान आज आपण अशाच एका अद्भुत स्टॉक संदर्भात जाणून घेणार आहोत ज्याने दीर्घ कालावधीत अर्थातच लॉन्ग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांच्या 60 हजाराचे दहा कोटी बनवलेत.

हे पण वाचा :- म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय? अर्ज भरतांना अडचण येतेय मग ‘या’ नंबरवर एक कॉल करा, अडचण होणार चुटकीसरशी दूर

हो बरोबर वाचताय तुम्ही ! आज आपण ज्या मल्टीबॅगर स्टॉक संदर्भात जाणून घेणार आहोत तो स्टॉक कधीकाळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर मात्र दहा पैशांवर ट्रेड करत होता आणि आज हा स्टॉक 172 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजे या शेअरने गुंतवणूकदारांच्या हजारो रुपयांचे करोडो रुपये बनवले आहेत ते ही वीस वर्षांच्या कार्यकाळात.

निश्चितच आता तुम्हाला या स्टॉक संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याची आतुरता लागली असेल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या स्टॉकसंदर्भात सखोल माहिती.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाहीर; केव्हापासून धावणार, कुठं राहणार थांबा? वाचा…..

कोणता आहे तो स्टॉक?

हा स्टॉक आहे GRM ओव्हरसीजचा. मिळालेल्या माहितीनुसार 2004 मध्ये हा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट झाला. त्यावेळी या स्टॉकची किंमत 0.10 रुपये होती. आणि शुक्रवारी अर्थातच 26 मे 2023 रोजी हा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 172 रुपयांवर ट्रेड करत होता. म्हणजे या वीस वर्षांच्या काळात या शेअरने तब्बल एक लाख 71 हजार टक्के रिटर्न्स आपल्या गुंतवणूकदारांना दिले आहेत.

म्हणजेच जर वीस वर्षांपूर्वी या स्टॉक मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने विश्वास दाखवून एक लाख रुपये गुंतवले असते आणि ही गुंतवणूक आत्तापर्यंत होल्ड करून ठेवली असती तर अशा गुंतवणूकदारांना तब्बल 17 कोटी 19 लाख रुपयाचा परतावा आज मिळाला असता.

मात्र गेल्या एका वर्षाच्या काळात हा स्टॉक 54 टक्क्याहून अधिक घसरला आहे. एकंदरीत या स्टॉकने दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची किमया चांगली आहे.

मित्रांनो येथे दिलेली माहिती ही केवळ स्टॉकच्या परफॉर्मन्स संदर्भात असते. हा कोणताही गुंतवणुकीचा पर्याय किंवा सल्ला नाही याची नोंद घ्यायची आहे.

हे पण वाचा :-jदहावी, बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! सशस्त्र सीमा दलात ‘या’ जागांसाठी निघाली मोठी भरती, आजच करा अर्ज

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe