Strawberry Farming : स्ट्रॉबेरी म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहते ते महाबळेश्वरचे चित्र. मात्र अलीकडे राज्यातील इतरही भागात स्ट्रॉबेरीची शेती होऊ लागली आहे. काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी राज्याच्या इतरही भागात स्ट्रॉबेरी शेती यशस्वी करून दाखवली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रयोगशील शेतकऱ्यांनी प्रतिकूल हवामानात देखील स्ट्रॉबेरीचे दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन घेतले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एका प्रगतिशील शेतकऱ्यांनी देखील प्रतिकूल हवामानात स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करून दाखवली आहे. जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या वांगी नंबर तीन येथील प्रयोगशील शेतकरी विकास वाघमोडे या शेतकऱ्याने आपल्या सात गुंठे शेत जमिनीत स्ट्रॉबेरीचे यशस्वी शेती केली आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर 625 कोटी 32 लाख रुपये झालेत जमा; तुम्हाला मिळाला का लाभ, पहा…..
विकास वाघमोडे यांनी सात गुंठ्यात स्ट्रॉबेरीची शेती करून तब्बल पाच लाखांची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या विकास यांची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. विकास यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी चार हजार स्ट्रॉबेरीची रोपे लावली. यासाठी त्यांना एक लाख 13 हजार रुपयांचा खर्च आला.
रोपांची लागवड केल्यानंतर योग्य पद्धतीने जोपासना केल्यामुळे यातून त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे. वास्तविक स्ट्रॉबेरी पिकासाठी महाबळेश्वर वाई आणि पाचगणी हे परिसर विशेष ओळखले जातात. हे भाग राज्यातील इतर भागाच्या तुलनेतं थंड असल्याने या ठिकाणी स्ट्रॉबेरी चे यशस्वी उत्पादन घेतले जाते.
हे पण वाचा :- मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ ठिकाणी तयार होताय तीन नवीन पूल, पहा सविस्तर
मात्र सोलापूर सारख्या उष्ण हवामानात देखील स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली जाऊ शकते हे वाघमोडे यांनी दाखवले आहे. यामुळे सध्या वाघमोडे यांचा प्रयोग पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी त्यांच्या बांधावर गर्दी करत आहेत. या ठिकाणी विशेष बाब अशी की प्रतिकूल हवामान असतानाही वाघमोडे यांनी स्ट्रॉबेरी पिकातून दर्जेदार उत्पादन मिळवले आहे. एकंदरीत शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करणे आता आवश्यक आहे.
वाघमोडे यांनी हा बदल केला असून त्यांच्या या प्रयोगामुळे त्यांना लाखो रुपयांची कमाई शेतीमधून होत असून त्यांच्या या प्रयोगाची भुरळ अनेकांना पडली आहे. वाघमोडे यांच्या या प्रयोगाचे पंचक्रोशीत कौतुक केले जात असून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कायमच आपल्या नवनवीन प्रयोगासाठी चर्चेत राहत असतात. वाघमोडे यांनी देखील नवीन प्रयोग करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वेगळेपण पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
हे पण वाचा :- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणीसह ‘या’ जिल्ह्यात पाऊस अन गारपीट होणार…